Sunday, 7 September 2008

गणपती बाप्पा मोरया !!!

भाद्रपद शुध्द चतुर्थी - गणेश चतुर्थी. आपले आराध्य दैवत विघ्नहर्ता गणराय घरोघरी विराजमान होतात.


घरी गणपती बाप्पा आले. लंडन च्या घरी पण छोटीशी पूजा करतो.


श्री गणेशाय नम:

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।


(श्री मयुरेश्र्वर - मोरगांव)

बाथ वरून शीतल आणी राहुल आले आहेत.


(श्री चिंतामणी - थेऊर)
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला त्याचे पूजन होते. "विघ्नानि नाशयायान्तु सर्वाणि सुरनायक' अशी प्रार्थना करण्याची प्रथा हजारो वर्षे सुरू आहे. एकदा शुभकार्य यशस्वीपणे पार पडले की मन समाधानाने फुलून जाते.

(श्री बल्लाळेश्वर - पाली)
गणपत्यर्थवशीर्षा'त श्री गणेशा आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे,ते असे.
हे गणेशा,तू तत्व आहेस.तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू आत्मा आहेस.तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस.तू सर्व काही आहेस

(वरदविनायक - महड)


बाप्पा साठी खीरपुरी चा नैवेद्य केला आहे.

(गिरीजात्मक - लेण्याद्री)
श्री गजाननाची षोडशोपचार पूजा करून घेऊ


(विघ्नेश्वर - ओझर)

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानेकोटी मोरेश्वरा बा तु घाल पोटी

(महागणपती - रांजणगाव)
आता आरती करुन घेऊ


(सिध्दीविनायक - सिध्दटेक)

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।



सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची



जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।।

खूप प्रसन्न वाटतं आरती झाली की

चला देवबाप्पांच झालं आता आमचा पोटोबा

दुपारी लंडन महाराष्ट्र मंडळ मध्ये १० दिवस गणेशोत्सव साठी जाऊन आलो

कस्तुरी पायघुडें चा उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता

त्या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्यासाठी सगळेजण एकत्र येतात

घरापासुन दुर असुनही गणेशोत्सव साजरा करताना खरच खुप छान वाटत आहे



गणपती बाप्पा मोरया पुढ ल्यावर्षी लवकर या .....