वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ: ।
निर्विघ्नं कुरुमेदेव सर्वकार्येषु सर्वदा ।।
बरेच दिवस अष्टविनायक ला drive करून जायची इच्छा होती , whatsapp ग्रुप chat वर जेजुरी चा विषय निघाला होता आणि सहजच बोलून गेलो अष्टविनायक करायचं आहे आणि सगळेच तयार झाले . आणि मग आमचं नेहमीचं trip planning . डिसेंबर मध्ये जवळपास सगळ्यांच्या सुट्ट्या होत्या तर मग २०, २१ आणि २२ डिसेंबर ला अष्टविनायक करायचं ठरवलं .जसे जसे दिवस जवळ आले तसं late night whatsapp वर गप्पांचा फड जमू लागला दररोज नवीन planning . तीन दिवसात जेजुरी आणि अष्टविनायक पूर्ण करायचं . base location असणार वाकड पुणे
तीन दिवसाचा एक travel plan बनवला आणि plan proper follow करायचं ठरवलं
पहाटे ५:०० - वाकड वरून जेजुरी कडे निघायचं
सकाळी ७:०० - जेजुरी ला खंडोबाचे दर्शन नंतर breakfast
सकाळी ९:०० - जेजुरी वरून मोरगाव (२० किमी )
सकाळी ११:०० - मोरगाव दर्शन करून सिद्धटेक कडे (७० किमी )
दुपारी १:०० - सिद्धटेक दर्शन आणि दुपारचे जेवण
दुपारी ३:०० - सिद्धटेक वरून रांजणगाव कडे (८० किमी )
दुपारी ४:३० - रांजणगाव दर्शन
संध्याकाळी ६:३० - रांजणगाव वरून थेऊर कडे (६५ किमी )
रात्री ८:३० - रांजणगाव दर्शन घेवून वाकड कडे
पहिला दिवस थोडा घाईगडबडीचा वाटत आहे पण पर्याय नाही पहाटे न चुकता ५ ला निघावच लागणार
दिवस २ रा (लेण्याद्री - ओझर - शिवनेरी )
सकाळी ६:३० - वाकड वरून लेण्याद्री कडे (११० किमी )
सकाळी ९:३० - लेण्याद्री गणपती दर्शन
सकाळी ११:३० - लेण्याद्री वरून ओझर कडे (१५ किमी )
दुपारी १:३० - ओझर विघ्नहर दर्शन करून दुपारचे जेवण घेवून शिवनेरी कडे (१५ किमी )
संध्याकाळी ५:३० - शिवनेरी वरून वाकड कडे
दिवस ३ रा - (महड - पाली - पेण )
सकाळी ८:०० - वाकड वरून महड कडे निघायचं
सकाळी ११:०० - महड वरदविनायकाचे दर्शन घेवून पाली कडे (३५ किमी )
दुपारी १:३० - बल्लाळेश्वर दर्शन घेऊन पेण
दुपारी ३:३० - पेण कडून मुंबई कडे प्रयाण
अष्टविनायक यात्रे च planning तर final झाल होत आता सगळे १९ तारखेची वाट बघत आहेत .
अल्पना , रीना, चंद्रशेखर , पराग आणि मी असे आम्ही ५ जण पहिल्या दिवशी निघणार , किरण आणि प्रसाद शनिवार आणि रविवारी बरोबर असणार. अल्पनाची RITZ आणि चंद्रशेखर ची I10 ने प्रवास करायचा आहे
गुरुवार, १९ डिसेंबर - पराग, रीना आणि चंद्रशेखर अल्पनाच्या घरी गोवंडी ला आले आणि तिथून वाकड ला माझ्या घरी यायला निघाले .
१९, डिसेंबर - रात्री ९:०० वाजता The HewittKatta gang माझ्या घरी आले . मी जेवणाची थोडी तयारी करून ठेवली होती . रीना मस्त वांग्याचे भरीत करणार होती . आल्या आल्या रीना आणि अल्पना किचन मध्ये गेल्या आणि मस्त भरीत बनवलं (ह्या वांग्याच्या भरीत च्या recipe चा एक वेगळा ब्लोग लिहायला हवा )
छान जेवण झालं सोसायटी मध्ये एक walk घेऊन आलो गप्पा टप्पा झाल्या आणि १२:३० च्या आसपास सकाळी ५ ला निघायचं आहे असं ठरवून झोपून गेलो
पहिला दिवस - २० डिसेंबर
पहाटे ३:३० - लवकरच जाग आली , रीना आणि अल्पना पण उठल्या होत्या . सगळ्यांचं आवरून झालं आणि आमची अष्टविनायक यात्रा सुरु झाली .
पहाटे ५:१५ - वाकड वरून आम्ही जेजुरी कडे निघालो . जेजुरी कडे हडपसर - दिवाघाट - सासवड ह्या पालखी मार्गावरून जाता येत पण मला कात्रज - बोपदेव घाटातून सासवड कडे जायला आवडतं रोड पण चांगला आहे आणि ह्या रस्त्यावर जास्त वर्दळ नसते
सगळे जण थंडी ची जोरात तयारी करून आले होते . दोन तीन दिवस आधी पुण्यात सकाळी ७-८ डी तापमान असायचं पण आज विशेष अशी थंडी जाणवत नाही आहे . बोपदेव घाटातून सासवड ला आलो आणि जेजुरी कडे निघालो ह्या मार्गावर रस्ता रुंदीकरण सुरु आहे आणि ५ - ६ किमी चा टप्पा खूपच खराब झाला आहे
सकाळी ६:४५ - जेजुरी ला पोचलो गाडी पार्क केली एकदम लवकर आलो होतो अजून मंदिरा जवळची दुकाने पण उघडली नाहीत
सकाळ च्या गारव्यात २०-२५ मिनिटात जेजुरी गड चढून देवळात आलो दर्शनाला अजिबात गर्दी नव्हती खंडोबाचं एकदम छान दर्शन झालं . जेजुरी गडाचा परिसर सगळी कडे भंडाऱ्या मुळे पिवळ्या धम्मक सोनेरी रंगाने उजळून गेल्या सारखा दिसतो
सकाळी ८:०० - जेजुरी वरून आम्ही आता मोरगाव कडे निघालो . अष्टविनायक पहिला गणपती
जेजुरी वरून बारामती कडे जाणाऱ्या रस्तावर २० किमी वर मोरगाव आहे . रस्ता एकदम छान आहे आणि असणारच ना पवार साहेबांच्या गावी जाणारा हा रस्ता :)
सकाळी ८:३०
मोरगाव च्या मयुरेश्वर गणपती चे खूपच छान दर्शन झाले
(मयुरेश्वर - मोरगाव )
मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे. मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहामनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने ५० फूट उंचीची संरक्षण भिंत आहे. गाभार्यातील मयूरेश्वराची मूर्ती बैठी, डाव्या सोंडेची, पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे. मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत. मस्तकावर नागराजाचा फणा आहे. मूर्तीच्या डाव्या- उजव्या बाजूस ऋद्धिसिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर आहेत.
असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला.त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.
या मंदिरात मयूरेश्वराबरोबर ऋद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली
सकाळी ९:३० - मोरगाव ला breakfast करून आम्ही सिद्धटेक कडे निघालो
मोरगाव ते सिद्धटेक जवळपास ७० किमी चा अंतर आहे . मोरगाव बारामती रोड वरून शिरूर सातारा रोड वर डावीकडे वळायच तिथून कडेगाव पर्यंत जावून तिथे पुणे सोलापूर रोड वर उजवी कडे वळायच पुढे पाटस पर्यंत जावून टोळ नाक्याच्या अलीकडे दौंड रोड वर डावी कडे वळायच . दौंड गावातून पुढे सिद्धटेक कडे आलो
सकाळी ११:०० वाजता - सिद्धटेक च्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले इथे पण दर्शन साठी अजिबात गर्दी नव्हती एकदम छान दर्शन झालं . सुरुवात तर खूपच छान झाली होती आम्ही आमच्या plan पेक्षा दोन तास पुढे आहोत
(सिद्धिविनायक - सिद्धटेक )
सिद्धिविनायक (सिद्धटेक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे.अष्टविनायकांमधील हा तिसरा गणपती.पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विश्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, त्यात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.
मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत
सकाळी ११:४५ - सिद्धटेक कडून रांजणगाव कडे निघालो . सिद्धटेक ते रांजणगाव जवळपास ८० किमी अंतर आहे रस्ता पण तितकासा चांगला नाही आम्ही विचारात विचारात निघालो तसा अल्पना google maps वर सारखं लक्ष ठेवून होती . सिद्धटेक वरून पुन्हा दौंड कडे येवून काष्टी कडे निघायचं तिथून नार्वी वरून Pipeline MIDC रोड वरून नगररोड वर यायचं . नगररोड वर डावी कडे वळलो कि लगेचच रांजणगाव येत
दुपारी १:४५ - आम्ही रांजणगाव ला पोचलो . रांजणगाव चा महागणपती इथे दर्शनासाठी थोडी गर्दी होती पण १५ - २० मिनिट मध्ये आमचं दर्शन झालं . रांजणगाव चा मंदिर पण खूप छान आहे इथे महागणपती त्रिपुरासुराचा वध केल्याची गोष्ट चित्ररूपाने भिंतीवर चितारली आहे
(महागणपती - रांजणगाव )
त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा केली होती. हे मंदिर शंकराने बांधले असून त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले.
या मंदिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत.
दुपारी २:३० - रांजणगाव मध्ये आम्ही lunch घेतला जेवण खूपच छान होतं . आता आम्ही plan पेक्षा बरच पुढे आलो होतो आजच्या दिवसातील फक्त थेऊर दर्शन बाकी होतं . थेऊर करून पुण्यात श्रीमंत दगडूशेट गणपती दर्शन करायचे ठरवले आणि तिथून तुळशीबागेत . तुळशीबागेत shopping चं नाव घेतल्या बरोबर रीना आणि अल्पनाच्या डोळ्यातील चमक बघण्यासारखी होती :-)
दुपारी ३:३० जेवण उरकून आम्ही आता थेऊर कडे निघालो driving seat वर आता अल्पना होती आणि रीना navigator मी, पराग आणि चंद्रशेखर मस्त मागे बसून प्रवास enjoy करत होतो .
रांजणगाव ते थेऊर जवळपास ४० किमी अंतर आहे नगररोड वरून पुण्याकडे जाताना लोणीकंद वरून डावीकडे थेऊर ला रस्ता जातो
दुपारी ४:३० - थेऊर च्या चिंतामणी चं आम्ही दर्शन घेतलं इथे पण दर्शनाला बिलकुल गर्दी नव्हती आज सकाळ पासून प्रत्येक देवळात खूपच छान दर्शन झालं . थेऊर ला आलो कि श्रीमंत माधवराव पेशव्यांची आठवण होते शेवट्या दिवसात ते थेऊर येथे होते. या गणपती समोरच त्यांची प्राणज्योत मालवली आणि रमाबाई इथेच त्यांच्या सोबत सती गेल्या . "स्वामी " कादंबरीतील माधवरावांच्या थेऊर मधल्या वास्तव्याच वर्णन वाचताना अंगावर अक्षरश काटा येतो
थेऊर ला ह्या आधी २- ३ वेळा येवून गेलो होतो मी . मंदिराचे लाकडी मंडप खूपच सुंदर आहे
(चिंतामणी - थेऊर)
राजा अभिजीत व राणी गुणवतीचा मुलगा गुणाने कपिलमुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरले. कपिलमुनींना हे कळले तेव्हा त्यांनी गणपतीला ते रत्न गुणाकडून परत आणण्याची विनंती केली.गणपतीने गुणाचा वध करून ते रत्न कपिलमुनींना दिले. मात्र, कपिलमुनींनी हे रत्न गणपतीला अर्पण केले. गणपतीच्या गळ्यात त्यांनी ते चढवले व त्यांची चिंताही दूर झाली. त्यामुळे गणपतीला येथे चिंतामणी या नावाने ओळखले जाऊ लागले
संध्याकाळी ५:०० - आमचे पहिल्या दिवसातील अष्टविनायक दर्शन खूप प्रसन्न दर्शनाने पूर्ण झाले होते आता आम्ही पुण्याकडे निघालो
संध्याकाळी ६:०० - पुण्यात संगमघाट वर गाडी पार्क केली आणि ऑटो ने दगडूशेट गणपती ला निघालो
श्रीमंत दगडूशेट गणपती चं भव्य आकर्षक रत्नजडीत रूप पाहून मूर्ती वर नजर थीरावते . आज दगडूशेट गणपतीचं दर्शन पण पटकन झालं थोडा वेळ मंदिरात बसून अल्पना आणि रीना ला तुळशीबागेत सोडलं
तिथेच नंतर चितळे बंधु च्या दुकानात बाकरवडी आणि इतर काही खरेदी करून वाकड ला घरी यायला निघालो
रात्री ८:३० घरी आलो सगळे दमले होते पण पहिला दिवस खूपच छान झाला सगळं वेळे आधी आणि अतिशय सुंदर दर्शन .
थोड्याच वेळात प्रसाद आणि प्रशांत पण घरी आले उद्या लेण्याद्री आणि ओझर करायचं आहे किरण आणि प्रसाद पण असणार उद्या सोबत
मस्त गप्पा टप्पा करून १ वाजता झोपून गेलो .
दुसरा दिवस - २१ डिसेंबर
पहाटे ५:०० - सकाळी सगळे वेळेवर उठलो आणि आवरलं चंद्रशेखर किरण ला घेवून आला
सकाळी ७:०० - वाकड वरून लेण्याद्री कडे निघालो ११० किमी चं अंतर आहे
पुणे नाशिक रोड वर नारायणगाव वरून डावी कडे जुन्नर गावातून लेण्याद्री कडे जाता येतं
पुणे नाशिक रोड वर सकाळी संस्कृती हॉटेल मध्ये नाश्ता करून आम्ही लेण्याद्री कडे निघालो
सकाळी १०:०० - लेण्याद्री डोंगरच्या पायथ्याला पोचलो
लेण्याद्री चा गिरिजात्मज, अष्टविनायकातील हा एकाच गणपती उंच डोंगरावर आहे पायथ्य पासून वर जायला २० -२५ मिनिटे लागतात
(गिरिजात्मज - लेण्याद्री )
पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज(पुत्र) म्हणून या गणपतीला 'गिरिजात्मज' हे नांव मिळाले.
पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे.
दुपारी १२:३० ला लेण्याद्री वरून खाली आलो . छान लिंबू सरबत घेतलं आणि ओझर कडे जायला निघालो
लेण्याद्री ते ओझर जास्त अंतर नाही १५ किमी चा प्रवास आहे पूर्ण रस्त्याच्या बाजूने उस आणि द्राक्षाच्या बऱ्याच बागा आहेत
दुपारी १:०० ला आम्ही ओझर ला आलो . इथे बऱ्याच ट्रिप च्या गाड्या आल्या होत्या त्या मुळे दर्शनाला थोडी गर्दी होती . ३० - ४० मिनिट मध्ये आमचं ओझर च्या विघ्नहर चं दर्शन झालं
(विघ्नहर - ओझर )
अष्टविनायकातला पाचवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर. या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला. यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली. गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे. विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
दुपारी २:०० वाजता मंदिरा समोरच्याच अष्टविनायक हॉटेल मध्ये जेवण केलं आणि शिवनेरी कडे निघालो
ओझर वरून शिवनेरी सुद्धा जास्त दूर नाही २०-२५ मिनिट मध्ये आम्ही शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याला पोचलो किल्ल्याच्या बऱ्याच वर पर्यंत गाडी जाते
शिवनेरी म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराजांच जन्मस्थान
दुपारी २:३० - शिवनेरी गड चढायला सुरुवात केली . आज सुद्धा आम्ही केलेल्या plan प्रमाणे थोडं लवकर दर्शन उरकलं होतं शिवनेरी वरून ४:३० वाजे पर्यंत निघून देहू सुद्धा करायचं ठरवलं .
शिवनेरी खूपच सुरेख किल्ला आहे जागो जागो फुलांच्या बागा बनवल्यात , चांगली स्वच्छता ठेवली आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे ह्या देवीवरूनच महाराजांचं नाव शिवाजी ठेवलं
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपति शिवाजी महाराजांचा जन्म ह्याच ठिकाणी फाल्गुन वद्य तृतीय शके १५५१ (१९ फेब्रुवारी १६३० ) रोजी झाला
ह्या स्थानाचे महत्व आयोध्येतील राम मंदिर किंवा मथुरेतील कृष्ण मंदिर एवढेच उच्च आहे माझ्या मते तरी काकणभर तरी सरसच आहे .
महाराज्यांच्या जन्म स्थानास अभिवादन करून आम्ही गड बघायला निघालो
गडावर एक बदामी टाक (तलाव ) आहे . कडेलोट टोक आहे , एक इदगाह आहे आणि जिजाबाई आणि बाळ शिवबाचा एक सुंदर पुतळा आहे . नंतर मग शिवाई देवी च दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला निघालो
दुपारी ४:३० - आम्ही शिवनेरी किल्ल्या वरून देहू कडे जायला निघालो , नाशिक रोड वरून पुण्याकडे जायला निघालो . देहू ला जाण्यासाठी आम्हाला चाकण वरून देहू रोड वर जायचं होत
मंचर जवळ एक छोटा break घेतला चहा नाष्टा केला आणि मार्गस्थ झालो
पण राजगुरुनगर जवळ एक तास traffic मध्ये अडकलो . उशीर झाला होता म्हणून देहू जाण्याचं रद्द करून सरळ पुण्याकडे निघालो
आज रात्री किरण कडे dinner ला जायचं होत
रात्री ८:३० - किरण च्या घरी बालेवाडी ला गेलो . स्वाती ने खूप छान जेवण केलं होत . सगळ्यान बरोबर किरण ची मुलगी आराध्या ने पण धम्माल केली
आज Colors वरच्या 24 serial चा शेवटचा episode होता तर सगळे ते बघत बसले आणि ११:३० ला किरण च्या घरून परत आलो
आजचा दिवस पण खूप छान झालं लेण्याद्री आणि शिवनेरी चढायला लागल्या मुळे सगळे दमले होते आणि लवकरच झोपी गेलो
तिसरा दिवस - २२ डिसेंबर
सकाळी ६:०० वाजता - आज थोडं आरामात उठलो . महड आणि पाली करायचं आहे . सकाळीच किरण चा फोन आला आज आमच्या बरोबर किरण ची family पण येणार आहे . स्वाती आणि आराध्या सोबत आले
सकाळी ८:०० - वाकड वरून महड कडे जायला आम्ही निघालो . महड कडे जायला मुंबई पुणे express way वरून खोपोली exit घ्यायचा खोपोलीत येवून जुना मुंबई रोड वरून सरळ पुढे यायचं ५ किमी वर महड लागत
सकाळी ९:४५ - आम्ही महड ला पोचलो , आज रविवार महड ला भरपूर गर्दी होती दर्शनाची रांग बाहेर रस्तावर आली होती आम्ही दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो साधारण एका तासाने महड च्या वरदविनायकाचे दर्शन झाले
अष्टविनायकातील हा एकमेव गणपती आहे ज्याचा जवळून दर्शन घेता येता .
(वरदविनायक - महड )
पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते. गुत्समद ऋषींनी या गणपतीची स्थापना केली असल्याची आख्यायिका आहे.वचकनवी नावाचे ऋषी होते. एकदा त्याच्या आश्रमाला राजा रूक्मांगदाने भेट दिली. त्यावेळी ऋषीपत्नी त्याच्या रूपावर मोहित झाली. तिने त्याला आपल्या आश्रमात बोलावले मात्र त्याने तिकडे जायला नकार दिला.हे देवांचा राजा इंद्राला कळाले तेव्हा त्याने रूक्मांगदाचे रूप घेऊन तिचा उपभोग घेतला. ऋषीपत्नी मुकुंदा हिला इंद्रापासून झालेला पुत्र म्हणजे गुत्समद. त्याला अनौरस पुत्र म्हणून हिणवले गेल्याने त्याने चिडून 'तू बोरीचे झाड होशील' असा शाप मातेला दिला, मात्र मातेला शाप दिल्याचे प्रायश्चित्त म्हणून गुत्समद ऋषिंनी मणिभद्र येथील अरण्यात 'ओम गंगणपतये नमः 'या मंत्र जपाने अनेक वर्षे घोर तपश्यर्या केली. त्यामुळे गणपती प्रसन्न झाले. त्यांनी गणपतीला 'इथेच राहून भक्तांची मनोकामना पूर्ण करावी' अशी विनंती केली. गणपतींनी आशिर्वाद दिल्या नंतर गुत्समद ऋषींनी गणपतीची स्थापना केली व त्याचे नांव वरदविनायक ठेवले.त्याला तेथे देऊळ सापडले तेच हे वरदविनायक देऊळ.
दुपारी १२: ०० महड ला दर्शन करून नाश्ता केला आणि पाली कडे जायला निघालो आमच्या अष्टविनायक यात्रेतील शेवटचा गणपती . महड पासून पाली ४० किमी आहे . परत खोपोली ला येवून तिथून खोपोली पेण रस्ता घायचा तिथून पाली फाट्यावर डावीकडे वळून Adlabs imagica च्या पुढे सरळ रस्ता पाली गावात येतो . मधला ८-१० किमी चा टप्पा खूप खराब आहे . एक तासाभरात आम्ही पाली ला पोचलो
दुपारी १: ०० वाजता - पाली चा बल्लाळेश्वर गणपती आज इथे पण दर्शनासाठी विशेष गर्दी नव्हती , १०-१५ मिनिट रांगेत राहून दर्शन झाले
( बल्लाळेश्वर - पाली )
कृत युगात येथे पल्लीपूर नांवाचे नगर होते. तेव्हा तेथे कल्याण नांवाचा वैशवाणी राहत असे. या कुटूंबात बल्लाळ नांवाचा सुपुत्र झाला. बल्लाळ लहानपणा पासून ध्यानधारणा व गणेशचिंतनात मग्न असे. अध्ययन व व्यापार न करता बल्लाळ भक्ती मार्गाला लागला व इतर सवंगड्यांनाही तेच करायला लावीत असे, म्हणून कल्याण शेठजींनी बल्लाळचा गणपती दूर फेकून दिला आणि बल्लाळला एका झाडाला बांधून ठेवले. नंतर बल्लाळने घरी जाणार नाही येथेच तुला देह अर्पण करीन अशा दृढनिश्चयाने ईश्वरचिंतन केले. त्याचा भक्तिभाव पाहून श्री गजाननाने विप्र रूपात प्रकट होऊन त्यांनी बल्लाळला बंधनातून मुक्त केले व त्याला वर दिला. बल्लाळाने विनायकाला विनंती केली की, आपण येथे कायमचे वास्तव्य करून भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात. तो वर बल्लाळाला देवून श्री गजाननाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. बल्लाळविनायक या नावाने श्रीगणेश येथील शिळे मध्ये अंतर्धान पावले. तीच ही बल्लाळेश्वराची मूर्ती आहे.
बल्लाळेश्वराचे दर्शन झाले आणि आमची अष्टविनायक यात्रा पूर्ण झाली
दुपारी ३:०० नागोठण्या जवळ lunch केला आणि सगळे पेणला आमच्या घरी आलो
घरी थोडं थांबून सगळे मुंबई कडे निघाले , गोवंडी ला अल्पनाच्या घरून गाडी घेवून पराग रीना आणि प्रसाद बोरीवली ला गेले . संध्याकाळी मी , किरण आणि स्वाती पुण्याला आलो . तीन दिवस जवळपास ९२५ किमी प्रवास करत श्री गजानना च्या कृपेने आमची अष्टविनायक यात्रा निर्विघ्नपणे पार पडली
!!! गणपती बाप्पा मोरया !!!