Monday, 18 June 2012

भेटी लागे जीवा !!!

 

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

नमस्कार माऊली ...

पंढरीची वारी ... सातशे वर्षांची अविरत परंपरा, एक संस्कृती. खूप काही ऐकलं होतं, पाहिलं होतं पण कधी वारीचा अनुभव घेतला नव्हता.
बरयाच वर्षांची इच्छा होती एकदा वारी मध्ये सहभागी होऊन वारी काय आहे ते समजून घ्यावे पण वेळ येत नव्हती. अचानक एके दिवशी  इन्फोसिस मधील माझा सहकारी , मित्र  अतुल बोलला ह्या वर्षी वारी मध्ये जायचं आहे आणि अस वाटलं पांडुरंगाने अतुल च्या रुपात वारी साठी कॉल केला आहे आणि ह्या वर्षी  फुल ना फुलाची पाकळी समजून कमीत कमी २-३ दिवस तरी वारी मध्ये जावून येऊ आणि शुक्रवार १५ जून ते रविवार १७ जून वारी मध्ये सहभागी व्हायचं ठरवलं. वारी चा हा टप्पा पुणे ते जेजुरी पर्यंतचा मध्ये सासवड ला एक दिवसाचा विसावा. ११ जून ला आळंदीतून निघालेली ज्ञानेश्वर माउलींची वारी पिंपरी मध्ये पाहिला मुक्काम करून पुण्या मध्ये वस्तीला होती आणि सकाळी ६ वाजता पुण्यातून सासवड कडे मार्गस्थ झाली. पाठोपाठ देहू वरून निघालेली जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी होती.
  [जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी ]
 शुक्रवार, १५ जून - सकाळी ८:००
आम्ही ऑटो ने रेसकोर्स रोड ला आलो आणि समोरच तुकाराम महाराजांच्या पालखी चं दर्शन झाले. मनात पांडुरंगाला भेटण्याची आस..., टाळ-मृदंगाचा गजर आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामांचे नाव अशा भक्तीमय वातावरणात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन लाखो वारकरी वारीत सहभागी झाले होते. अवर्णनीय  भारावून टाकणारं भक्तिमय वातावरण तयार झालं होतं आणि ह्याच वातावरणात पुढचे ३ दिवस आमचा प्रवास सुरु राहणार होता.



[ज्ञानेश्वर माउली पालखी ]


"ज्ञानोबा माउली तुकाराम ..." लाखो वारकऱ्यांचा एका सुरात चाललेला हा गजर खरच मंत्रमुग्ध करून टाकतो.
तुकाराम महाराजांच्या पालखी पुढे श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी होती. हडपसर नंतर तुकाराम महाराजांची पालखी सोलापूर महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने निघते आणि ज्ञानेश्वर माउलींची पालखी सासवड च्या दिशेने मार्गक्रमण करू लागते.


जसा देश तसा वेश, आयटी कल्चर मधले कडक इस्त्रीचे कपडे बदलून वारकऱ्यांचे पांढरा सदरा, डोक्यावर गांधी टोपी आणि कपाळाला चंदनी टिळा लावला आणि आपोआप मातीशी नाळ जोडली गेली.






दूर दूर वर नजर जात होती तिथपर्यंत भाविकांच्या हातातील भगवे पतके दिसत आहेत. तथाकथित सेक्युलरीसम ने भगव्या झेंड्या ला संकुचित केलं आहे. भगवा हिंदूच धार्मिक प्रतिक आहेच पण त्याच प्रमाणे आपल्या संस्कृतीचा प्रतिक आहे.. संताच्या सदभावनेच आणि वीरांच्या शौर्याचं प्रतिक आहे.






पुणे ते सासवड, वारीतील हा सर्वात मोठा टप्पा जवळपास ३५ किलोमीटर चा पायी प्रवास आणि मध्ये दिवे घाट.
दुपारी १२:३० - पुण्यातून निघाल्या पासून पहिली विश्रांती आम्ही दिवेघाटाच्या पायथ्याशी घेतली. माउलींची पालखी येथे घटका भर विश्रांती घेते. माझा मित्र दत्ता पाटील, त्याचे बाबा दरवर्षी नेमाने वारीला येतात. काल त्यांच्याशी बोलणं झालं होता. इथेच त्यांची भेट झाली आणि आम्ही त्यांच्या दिंडीत सहभागी झालो आणि इथूनच आमचा खरा वारीचा प्रवास सुरु झाला. माउलींच्या पालखी रथाला २ बैल जोडलेले असतात पण दिवे घाट चढून जाण्यासाठी इथे रथाला ७ बैल जोड्या जोडल्या जातात आणि पालखी सोहळा बघायला पूर्ण दिवेघाटात असंख्य जनसमुदाय जमा झालेला असतो.


जय जय राम कृष्ण हरी | जय जय राम कृष्ण हरी ||

                                                 तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||

असे विविध अभंग म्हणत आम्ही सुधा दिंडी सोबत चालत होतो.

दिंडी मध्ये लाखो भाविक आहेत पण कुठे गडबड नाही गोंधळ नाही, वारी सोबत जास्त पोलीस सुद्धा  नाहीत, इथे प्रत्येकजण स्वयंसेवक आहे, शिस्तबद्ध आहे. प्रत्येक दिंडीला नंबर दिलेला आहे आणि दिंडी त्याच क्रमांकाने चालत असते. आमचा दिंडी क्रमांक आहे ५५ ह्या दिंडीत जवळपास १२५ वारकरी आहेत . माउलींच्या रथाच्या पुढे २५ दिंड्या आहेत आणि रथाच्या मागे २००.

दिवे घाटातील दृश्य खूपच रोमहर्षक आहे पूर्ण घाटात वारकरी दिसत आहेत. सगळे मिडिया पण ते प्रक्षपण करण्या साठी घाट माथ्यावर उपस्थित होते.
जवळपास सगळे वारकरी पन्नाशी किंवा साठी ओलांडलेले आहेत पण त्यांचा उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा आहे. मला आणि अतुल ला घाटामध्ये वारकर्यांच्या बरोबरीने चालणं पण कठीण जात होतं. पांडुरंगाला भेटण्याची आंतरिक ओढच ह्या सर्व वारकर्यांना इतकं चालायची शक्ती प्रदान करते.


वारीत कोणी दादा, काका, मामा, ताई, मावशी नाही सर्वांचे एकाच नाव "माउली". कोणी लहान मोठा नाही, सगळे लहानथोरांना "नमस्कार माउली" बोलत पाया पडतात. सामाजिक बंधुभाव, एकमेकांप्रती आदर हा वारीचा अविभाज्य हिस्सा आहे.




दुपारी ४:३० : दिवेघाट चढून वारी घाट माथ्यावर आली इथे पालखी साठी विसावा आहे. जागो जागी वेगवेगळ्या संघटना आणि लोकांनी वारकर्यांसाठी चहा, पाणी, खिचडी सारख्या फराळाची व्यवस्था केली आहे. थोडा विसावा घेवून आमची दिंडी आता सासवड कडे मुक्कामी निघाली आहे, इथून सासवड ८ किलोमीटर आहे.
जवळपास तीस ते चाळीस हजार लोकसंखेच सासवड गाव, आज इथे ५ लाख वारकरी वस्तीला येतात.
गावाच्या आजूबाजूला सगळी कडे वारकऱ्यांचे तंबू आहेत. प्रत्येक दिंडी सोबत ट्रक असतात त्या मध्ये राहायचे तंबू आणि जेवण बनवायचे साहित्य असते. दिंडी मुक्कामी जाण्याआधी हे ट्रक मुक्कामच्या ठिकाणी जावून तंबू टाकतात. प्रत्येक गावी प्रत्येक दिंडी ची तंबू लावण्याची जागा दरवषी साठी ठरलेली असते आणि दिंडी तिथे पोचण्याआधी तंबू लावून झालेले असतात. इतके काटेकोर नियोजन खचितच कुठे बघायला मिळेल.

रात्री ९:०० - सासवड मध्ये आम्ही दिंडी नंबर ५५ च्या मुक्कामी पोचलो आणि हि जागा माउलींच्या पालखी च्या मुक्कामाच्या अगदी बाजूलाच होती. आमच्या सोबत एक पोर्टेबल तंबू घेवून गेलो होतो. सर्व प्रथम आराम करण्या साठी तंबू टाकला. जवळपास ३५ किलोमीटर अंतर चालून आलो शरीर थकून गेलं होतं. "चालून चालून पायाचे तुकडे झाले ." ह्या ओळीचा शब्दश: अर्थ आज समजला होता. आमच्या ह्या तंबूचा दिंडीतील सगळ्या वारकर्यांना अप्रूप वाटत होतं. बरेच जण हा काय प्रकार आहे बघून गेले. त्याच बरोबर आम्ही वारी मध्ये आलो आहे ह्याचा पण सर्वाना कौतुक वाटत होतं. पुढचे दोन दिवस खूपच आपुलकी आणि जिव्हाळ्याने सर्वांनी आम्हाला सोबत घेतलं.
उद्याचा पूर्ण दिवस वारीचा सासवड ला मुक्काम आहे.
शनिवार १६ जून, सकाळचे ६:००: लवकरच जाग आली. आमच्या आधी सगळे वारकरी उठून तयार झाले होते. आम्ही पण सकाळचे आन्हिक उरकून घेतले. पाय अजून हि दुखत आहेत पण आज दिवसभर आराम करायचा आहे. सकाळीच दिंडीतील वारकर्यांनी भजनाची बैठक बसवली आणि आम्ही पण त्यांच्यात सामील झालो.
रूप पाहता हो लोचनी | सुख झाले वो साजणी ||
तो हा विठ्ठल | बरवा तो हा माधव बरवा ||
**
बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल | करावा विठ्ठल जीवभाव ||
येणे सोसे मन झाले हावभरी | परत माघारी नेत नाही ||

टाळ मृदुंगाच्या गजरात अभंग गाताना मन आनंदुन जात. आपण हाय बिट्स गाणी ऐकतो.... डिस्क मध्ये जातो.. धकाधकीच्या जीवनात अशा प्रकारे एक "kick " हवी असते. टाळ मृदुंगाच्या आवाजात ती "kick " अनुभवायला मिळते.

वारीच्या मुक्कामी बऱ्याचश्या सेवाभावी संघटना वारकर्यांसाठी मेडिकल सेवा, पाणी पुरवीत असतात. एक गोष्ट जाणवली वारकर्यांची सरकार कडून काहीच अपेक्षा नाही आहे, पण सरकारने एक कर्तव्य म्हणून तरी वारकर्यांना काही जुजबी अत्यावश्यक सेवा पुरवायला हव्यात पण इथे सुद्धा अपेक्षाभंगच झाला.


शनिवार संध्याकाळ - पूर्ण सासवड शहरत वारकर्यांचे तंबू उभे आहेत आणि परतेक दिंडी मध्ये पांडुरंगाचे अभंग, हरिपाठाचे पारायण सुरु आहे. आजचा सासवड चा मुक्काम उरकून उद्या सकाळी पालखी जेजुरी कडे प्रयाण करणार.

रविवार १७ जून, पहाटे ३:०० - सगळे वारकरी पहाटे लवकर उठतात, तंबू मोडून समान ट्रक मध्ये भरतात आणि ट्रक पालखी निघायच्या आधी पुढच्या मुक्कामी रवाने होतात.

पहाटे ४:०० - ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी समोर छान काकड भजन सुरु आहे. माउलींच्या दर्शन साठी वारकर्यांनी रांग लावली आहे. आम्ही सुद्धा आमचा समान आवरून ठेवलं आहे आणि पुन्हा एकदा वारी मध्ये सामील होण्यासाठी तयार आहोत.

सकाळी ६:०० - माउलींचा रथ तयार झाला आहे. आम्ही खरच नशीबवान माउलींच्या रथाच्या इतक्या समीप राहायला मिळाला आम्हाला. सकाळीच माउलींच्या स्वागतासाठी वरुणराजाच आगमन झालं. वारकर्यांची मात्र धांदल उडाली, पाऊसात वारी करण्यासाठी त्यांच्या कडे प्लास्टिक चे इरलं असतं.








सकाळी ७:३०: माउलींच्या पालखीचं सासवड वरून प्रस्थान झाला. विठू नामाचा गजर करीत पालखी सासवड गावातून जेजुरी कडे चालू लागली. जेजुरी कडे जाताना एक रस्ता नारायणपूर कडे जातो. ह्याच रस्त्यावर वारीला राम राम करून परतीच्या प्रवासाला निघतो आणि इथूनच आमचा पांडुरंगाच्या चरणी नमस्कार

भेटी लागे जीवा लागलीसे आस | पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||

तुझे भक्ती सुख द्यावे मज प्रेम | वसो तुझे नाम माझे चित्ती |
सुभाक्ती विचार राहो माझे चित्त | हीच कृपा मूर्ती द्यावी मज |
तुझी दास जागी म्हणवितो विख्यात | पसरवला हात फिरवू नको |
नाम म्हणे देवा द्यावे इतके मज | ऐकुनी केशवराज होय बोले |
भेटी लागे जीवा लागलीसे आस | पाहे रात्रंदिवस वाट तुझी ||



किशोर केशव झेमसे
zemasekk@gmail.com

Saturday, 9 January 2010

नटरंग ( Natarang )

मला जाउद्या ना घरी ( Mala Jaudya na ghari)
चैतपुनवेची रात आज आलिया भरात, धडधड काळजात माझिया मायीना
कधी कवा कुठ कसा जीव झाला येडपिसा त्याचा नाई भरवसा तोल राहीना

राखलीकी मर्जी तुमच्या जोडीने मी आले, पिरतीच्या ह्या रंगी राया चिंब ओली मी जाहले
राया सोडा आता तरी काळ येळ न्हाई बरी पुन्हा भेटू केंव्हा तरी सजणा ssss
मला जाउद्या ना घरी...... आता वाजले कि बारा !!!!

कशापाई छळता मागं माग फिरता आसं काय करता दाजी हिला भेटा कि येत्या बाजारी
sss सहाची बी गाडी गेली नऊची बी गेली आता बाराची गाडी निघाली
हिला जाउद्या ना घरी.... आता वाजले कि बारा !!!

ऐनावानी रूपं माझं उभी ज्वानीच्या मी उंबरात, नादावर खुळपिसं कबुतर हे माज्या उरात
भवताली भय झाली रात मोकाट हि चांदण्याची उगघाई कशापाई हाय नजर उभ्यागावाची
ss नारी गं रानी गंsss हाय नजर उभ्या गावाची
sss शेत आलं राखणीला रघु झालं गोळा शीळ घाली अडून कुणी करून तिरपा डोळा
आता कसं किती झाकू सांगा कुठवर राखू राया भान माझं मला राहीना ssss
मला जाउद्या ना घरी... आता वाजले कि बारा !!!

होsss आला पाड झाला भार भरली उभारी घाटाघाटाला तंग चोळी अंग जाळी टंच डाळींब फुटलं ओठाला
गार वारा झोंबणारा गाड पदर जागी ठरना अडोशाच्या खोडीच मी कसं गुपित राखू कळेना
sss नारी गं रानी गंssss कसं गुपित राखू कळेना
sss मोरावानी डौल माझा मैनेवानी तोरा औंदाच्या या वर्साला मी गाठलं वय सोळा
जीव लागलीया गोडी तरी काळ काढा थोडी घडी हाताची हि तुम्ही राहूद्याsss
मला जाउद्या ना घरी.... आता वाजले कि बारा !!!


*******************************************************************************************************

||खेळ मांडला || (Khel Mandala)

तुझ्या पायरीशी कुणी सानथोर न्हाई |
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई |
तरी देवा सरना ह्यो भोग कशा पाई |
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही |
ववाळूनी उधळतो जीव मायबापा मन वायू उरी पेटला |
खेळ मांडला ... खेळ मांडला ||

सांडली गा रीतभात
घेतला वसा तुझा |
तूच वाट दाखीव गा |
खेळ मांडला ||

दावी देवा पैल पार |
पाठीशी तू रहा उभा |
ह्यो तुझ्याच उंबरयात
खेळ मांडला ||

उसवलं गणगोत सार आधार कुणाचा न्हाई |
भेगाड्ल्या भुइपरी जिणं अंगार जीवाला जाळी |
बळ दे झुनजायला कीर्तीची ढाल दे |
इनवती पंचप्राण जीव्हारात त्राण दे |
करपल रान देवा जळल शिवार तरी न्हाई धीर सांडला |
खेळ मांडला ... खेळ मांडला ||

**********************************************************************************************

||अप्सरा आली|| (Apsara Aali)

... कोमल काया, कि मोहमाया
पुनव चांदन न्हाले, सोन्यात सजले
रुप्यात भिजले, रत्नप्रभा तनु न्याले

हि नटली थटली, जशी उमटली
चांदणी रंग महाली, मी यौवन बिजली
पाहून थिजली इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली आली रत्नप्रभा जणू न्याली
ती हसली आली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदन न्हाली

हो... छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार
छबीदार सुरत देखनी जणू हिरकनी नार गुलजार
सांगणे उमर कंचुकी बापुडी मुखी सोसते भार
शेलटी कुणा वेकटी कशी हनुवटी नयन तलवार

हि रती मदभरली दागी ठिणगी शिनगाराची
कस्तुरी दरवळली ताजी रूप हि वा-याची

हि नटली थटली, जशी उमटली
चांदणी रंग महाली, मी यौवन बिजली
पाहून थिजली, इंद्रसभा भवताली

अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली
पसरली आली रत्नप्रभा जणू न्याली
ती हसली आली चांदणी रंगमहाली
अप्सरा आली पुनव चांदन न्हाली

http://www.4shared.com/file/140132299/cabb0cd4/Apsara_aali__-_Natrang_.html?s=1

Sunday, 7 September 2008

गणपती बाप्पा मोरया !!!

भाद्रपद शुध्द चतुर्थी - गणेश चतुर्थी. आपले आराध्य दैवत विघ्नहर्ता गणराय घरोघरी विराजमान होतात.


घरी गणपती बाप्पा आले. लंडन च्या घरी पण छोटीशी पूजा करतो.


श्री गणेशाय नम:

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।


(श्री मयुरेश्र्वर - मोरगांव)

बाथ वरून शीतल आणी राहुल आले आहेत.


(श्री चिंतामणी - थेऊर)
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला त्याचे पूजन होते. "विघ्नानि नाशयायान्तु सर्वाणि सुरनायक' अशी प्रार्थना करण्याची प्रथा हजारो वर्षे सुरू आहे. एकदा शुभकार्य यशस्वीपणे पार पडले की मन समाधानाने फुलून जाते.

(श्री बल्लाळेश्वर - पाली)
गणपत्यर्थवशीर्षा'त श्री गणेशा आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे,ते असे.
हे गणेशा,तू तत्व आहेस.तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू आत्मा आहेस.तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस.तू सर्व काही आहेस

(वरदविनायक - महड)


बाप्पा साठी खीरपुरी चा नैवेद्य केला आहे.

(गिरीजात्मक - लेण्याद्री)
श्री गजाननाची षोडशोपचार पूजा करून घेऊ


(विघ्नेश्वर - ओझर)

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानेकोटी मोरेश्वरा बा तु घाल पोटी

(महागणपती - रांजणगाव)
आता आरती करुन घेऊ


(सिध्दीविनायक - सिध्दटेक)

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।



सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची



जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।।

खूप प्रसन्न वाटतं आरती झाली की

चला देवबाप्पांच झालं आता आमचा पोटोबा

दुपारी लंडन महाराष्ट्र मंडळ मध्ये १० दिवस गणेशोत्सव साठी जाऊन आलो

कस्तुरी पायघुडें चा उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता

त्या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्यासाठी सगळेजण एकत्र येतात

घरापासुन दुर असुनही गणेशोत्सव साजरा करताना खरच खुप छान वाटत आहे



गणपती बाप्पा मोरया पुढ ल्यावर्षी लवकर या .....

Sunday, 17 August 2008

Narali Bhat (नारळी भात)

आज नारळी पौर्णिमा - रक्षाबंधन, सकाळी योगेश ने मला राखी बांधली आणी मी त्याला. घरी phona phoni झाली...ताईला नारळी भाताची Receipe विचारली होती. आज काही special plan नाही, दुपारी Cricket खेळून आलो आणी decide केला evening ला नारळी भात बनवायचा. आम्हा दोघांना नाहीतर काय काम आहे दुसरं -:)
२ वाटी बासमती Rice पाण्यामध्ये धुऊन 30-35 minutes ठेवले.

सगळे शाही पदार्थ घेतले आहेत - चारोळी, बदाम, पिस्ता, काजु, मनुके थोडी काळी मिरी, ३-४ लवंग आणि दालचीनी .......


नारळीभात बनवायचा ...... नारळ तर must ना

नारळ फोडायला माझ्या Kitchen मध्ये काहीच नाही....... सुरीने फोडला -:)
नारळाचे दुध करायला खोब-या चे बारीक तुकडे करून घेतले.

आता Mixer मधे खोबरं बारीक करून घेऊ

Courtesy Santosh, India जाताना हा Mixer Gift दिला होता -:)

खोबरं तर Mixer मधुन काढलं

आणि आता नारळाचे दुध

चला आता preparation सुरु ...... १ चमचा चितळेंचा तुप (चितळें चा म्हणजे साजुक तुप -:) )


तुप गरम झालं की आधी थोडी काळी मिरी लवंग आणि दालचीनी टाकली


1 - 2 minutes काळीमिरी,लवंग आणि दालचीनी तुपात परतुन घेतली


आता सगळे शाही पदार्थ परतुन घेतो

आता ह्यामधे मघाशी काढुन ठेवलेला बासमती Rice mix करू


त्यात थोडे बेदाणे .......



रंग यायला थोडं केशर .....

नारळाचं दुध टाकुन भात शिजायला ठेऊ - 2 वाटी Rice साठी 4 वाटी नारळाचं दुध

आता 10-15 mins भात शिजऊन घेतो ........


वाह छान शिजला आहे !!!

1 वाटी साखर टाकतो थोडी जास्त साखर टाकली तरी हरकत नाही, पण मला जास्त गोड भात नाही आवडत.


5-7 minutes मंद Gas वर ठेवतो साखरेचा छान पाक तयार होइल

Its done...गरमा गरम sweet नारळी भात


बरोबर पापड लोणचं आणी चटणी .... धम्माल ना

योगेश एकदम नंबर १ taste आहे ना