Sunday, 7 September 2008

गणपती बाप्पा मोरया !!!

भाद्रपद शुध्द चतुर्थी - गणेश चतुर्थी. आपले आराध्य दैवत विघ्नहर्ता गणराय घरोघरी विराजमान होतात.


घरी गणपती बाप्पा आले. लंडन च्या घरी पण छोटीशी पूजा करतो.


श्री गणेशाय नम:

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।


(श्री मयुरेश्र्वर - मोरगांव)

बाथ वरून शीतल आणी राहुल आले आहेत.


(श्री चिंतामणी - थेऊर)
गणपती हा विघ्नहर्ता असल्याने प्रत्येक शुभकार्याच्या सुरूवातीला त्याचे पूजन होते. "विघ्नानि नाशयायान्तु सर्वाणि सुरनायक' अशी प्रार्थना करण्याची प्रथा हजारो वर्षे सुरू आहे. एकदा शुभकार्य यशस्वीपणे पार पडले की मन समाधानाने फुलून जाते.

(श्री बल्लाळेश्वर - पाली)
गणपत्यर्थवशीर्षा'त श्री गणेशा आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन केले आहे,ते असे.
हे गणेशा,तू तत्व आहेस.तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तू आत्मा आहेस.तू ज्ञानमय, विज्ञानमय आहेस.तू सर्व काही आहेस

(वरदविनायक - महड)


बाप्पा साठी खीरपुरी चा नैवेद्य केला आहे.

(गिरीजात्मक - लेण्याद्री)
श्री गजाननाची षोडशोपचार पूजा करून घेऊ


(विघ्नेश्वर - ओझर)

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानेकोटी मोरेश्वरा बा तु घाल पोटी

(महागणपती - रांजणगाव)
आता आरती करुन घेऊ


(सिध्दीविनायक - सिध्दटेक)

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।



सर्वांग सुंदर उटी शेंदुराची ।। कंठी झळके माळ मुक्ता फळाची



जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती ।। दर्शनमात्रे मन कामना पुरती ।।

खूप प्रसन्न वाटतं आरती झाली की

चला देवबाप्पांच झालं आता आमचा पोटोबा

दुपारी लंडन महाराष्ट्र मंडळ मध्ये १० दिवस गणेशोत्सव साठी जाऊन आलो

कस्तुरी पायघुडें चा उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होता

त्या निमित्ताने महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपण्यासाठी सगळेजण एकत्र येतात

घरापासुन दुर असुनही गणेशोत्सव साजरा करताना खरच खुप छान वाटत आहे



गणपती बाप्पा मोरया पुढ ल्यावर्षी लवकर या .....

Sunday, 17 August 2008

Narali Bhat (नारळी भात)

आज नारळी पौर्णिमा - रक्षाबंधन, सकाळी योगेश ने मला राखी बांधली आणी मी त्याला. घरी phona phoni झाली...ताईला नारळी भाताची Receipe विचारली होती. आज काही special plan नाही, दुपारी Cricket खेळून आलो आणी decide केला evening ला नारळी भात बनवायचा. आम्हा दोघांना नाहीतर काय काम आहे दुसरं -:)
२ वाटी बासमती Rice पाण्यामध्ये धुऊन 30-35 minutes ठेवले.

सगळे शाही पदार्थ घेतले आहेत - चारोळी, बदाम, पिस्ता, काजु, मनुके थोडी काळी मिरी, ३-४ लवंग आणि दालचीनी .......


नारळीभात बनवायचा ...... नारळ तर must ना

नारळ फोडायला माझ्या Kitchen मध्ये काहीच नाही....... सुरीने फोडला -:)
नारळाचे दुध करायला खोब-या चे बारीक तुकडे करून घेतले.

आता Mixer मधे खोबरं बारीक करून घेऊ

Courtesy Santosh, India जाताना हा Mixer Gift दिला होता -:)

खोबरं तर Mixer मधुन काढलं

आणि आता नारळाचे दुध

चला आता preparation सुरु ...... १ चमचा चितळेंचा तुप (चितळें चा म्हणजे साजुक तुप -:) )


तुप गरम झालं की आधी थोडी काळी मिरी लवंग आणि दालचीनी टाकली


1 - 2 minutes काळीमिरी,लवंग आणि दालचीनी तुपात परतुन घेतली


आता सगळे शाही पदार्थ परतुन घेतो

आता ह्यामधे मघाशी काढुन ठेवलेला बासमती Rice mix करू


त्यात थोडे बेदाणे .......



रंग यायला थोडं केशर .....

नारळाचं दुध टाकुन भात शिजायला ठेऊ - 2 वाटी Rice साठी 4 वाटी नारळाचं दुध

आता 10-15 mins भात शिजऊन घेतो ........


वाह छान शिजला आहे !!!

1 वाटी साखर टाकतो थोडी जास्त साखर टाकली तरी हरकत नाही, पण मला जास्त गोड भात नाही आवडत.


5-7 minutes मंद Gas वर ठेवतो साखरेचा छान पाक तयार होइल

Its done...गरमा गरम sweet नारळी भात


बरोबर पापड लोणचं आणी चटणी .... धम्माल ना

योगेश एकदम नंबर १ taste आहे ना


Wednesday, 25 June 2008

इतिहासातील कोकणी माणूस !!!!


इ. स. १६५७ ते ५८ दरम्यान कोकणातील स्वारीत शिवाजीराजांच्या नजरेस अनेक गोष्टी आल्या. काही सुखावणाऱ्या तर काही मिरचीसारख्या झोंबणाऱ्या त्यात राजांना जी कोकणी मनं आणि मनगटं गवसली , ती फारच मोलाची होती. मायनाक भंडारी , बेंटाजी भाटकर , दौलतखान , सिदी मिस्त्री , इब्राहिमखान , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी सरपाटील आणि असे अनेक. आगरी भंडारी , कोळी , कुणबी , प्रभू , सारस्वत मंडळी महाराजांच्या या जागर- गोंधळात कर्तृत्त्वाचे पोत पेटवून राजांच्या भोवती हुकूम झेलायला अधीरतेन गोळा होऊ लागली. हे सारेच समाजगट खरोखर गुणी होते. शौर्य , धाडस , कल्पकता , निष्ठा पराक्रमाची हौस आणि उत्तुंग महत्त्वाकांक्षा या तरुणांच्या रोमरोमात उसळत होती. राजांनी या कोकणी चतुर काळसुंद्यांचा अचूक उपयोग करायच्या योजना आखल्या. कृतीतही आणल्या. या आगरी , कोळी , भंडारी पोरांचं काय सागरी अप्रूप सांगावं ? जन्मल्यावर यांना आधी समुदात पोहता येत होतं. अन् मग जमिनीवर रांगता येत होतं.
शिवाजीराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबानं मराठी राज्य गिळून टाकण्याकरता अमाप दळवादळ घेऊन इथं स्वारी केली. पंचवीस वर्ष तो मराठी देशावर थैमान घालत होता. पण कोकणात किनारपट्टीचा एकही सागरी किल्ला अन् कोकणची वीतभर जमिनही औरंगजेबाला पंचवीस वर्षात जिंकता आली नाही. अजिंक्य! कोकण अजिंक्य , भंडारी अजिंक्य , आगरी अजिंक्य , कोळी अजिंक्य , समुद अजिंक्य , मराठी राज्य आणि मराठी ध्वज अजिंक्य. हे कर्तृत्त्व कोणाचं ? हे या कोकणी मर्दांचं. आणि आज याच माणसांना आम्ही मुंबईत ' रामागाडी ' म्हणून भांडी घासायला लावतोय. मॅक्सी अन् साड्या धुवून वाळत घालायला लावतोय. हॉटेलात कपबश्या विसळायला लावतोय. वास्तविक यांचा मान भारताच्या आरमारी नौकांवरून शत्रूवर तोफा बंदुकांनी सरबत्ती करण्याचा आहे. ही सारी मार्शल रेस आहे. शिवाजीमहाराजांनी तीनशे वर्षांपूवीर् हे ओळखलं. कोकण अजिंक्य बनवलं. आमच्या लक्षात केव्हा येणार ? ब्रिटीश विल्यम पिप्ससारखा एखादा कान्होजी आंग्रा , मायनाक भंडारी किंवा एखादा मराठी दौलतखान आम्हाला आज लाभेल का ?

Tuesday, 24 June 2008

मला आभिमान आहे मराठीचा !!!

मला आभिमान आहे कारण .......

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

मी मराठी आहे कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो..मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही..मी मराठी आहे कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकले तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं..मी मराठी आहे कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं..आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही..आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही..आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात..आम्ही मराठी आहोत कारण अगदी अत्याधुनिक home appliances ने घर सजवल तरी दाराला झेंडू च्या फुलांच आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावल्या शिवाय समाधान होत नाही..ब्राम्हण क्षत्रिय वैश्य क्षुद्र..जात कोणतीही असो..आम्ही महाराष्ट्रीयन आहोत..आणि आमच्यातलं मराठीपण सगळीकडे तेच आहे..माझ्यातलं मराठीपण जोपासण्याची मला आवश्यकता नाही..कारण हे मराठीपण माझ्या रक्तात भिनलय..आणि या मराठीपणाचा मला अभिमान आहे..!!