Thursday, 6 June 2013

इतिहासातून दोन शब्द - ५. शिवराज्याभिषेक

शिवराज्याभिषेक

 
 
६. जून १६७४  शिवाजी महाराज छत्रपति - सिंहासनाधीश्वर झाले. अकबर, शहाजान, औरंगजेब अशा  धर्मद्वेष्ट्या जुलमी  मुघली पारतंत्राचा ३००  वर्षाचा अंधारमय काळ संपून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. शिवराज्याभिषेक म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्णपानच, ह्या राज्याभिषेकाने शतकांच्या गुलामगिरिवर  स्वाभिमानाची फुंकर घातली, सह्याद्री स्वतंत्र झाला आणि हिमालय सह्याद्रीकडे आशेने बघू लागला 
 
गागाभट्टानी  ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ सुर्योदयास तीन घटका अवधी असताना म्हणजेच पहाटे ५ वाजता चा महाराजांचा राज्यारोहणाचा मुहूर्त काढला होता . राज्याभिषेकातील प्रत्येक विधी गागाभट्टानी अत्यंत अभ्यासपूर्वक, शास्त्रीय चिकित्स्तेने व अत्यंत सापेक्षेने पार पाडला होता 
 
शिवरायांनी स्वतःसाठी राज्य उभारलं नव्हतं  तर रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभारल होतं  . 
 
महाराजांनी युद्धात शत्रूला हरवून फक्त गड कोट जिंकले असं नसून त्याच बरोबर त्यांचं Administration , दैनंदिन राज्यकारभार तत्कालीन राज्यकर्त्यांपेक्षा खूपच प्रगत होत. 
 
अष्टप्रधान मंत्रिमंडळ राज्यातील महत्वाच्या प्रत्येक विभागाची व्यवस्था पाहत होतं .  या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते
 
पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे.
 
पंत अमात्य (Finance Minister ) : रामचंद्र निलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते.
 
पंत सचिव (सुरनिस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणाऱ्या येणार्‍य पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते.
 
मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे.
 
सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती.
 
पंत सुमंत (डाबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते.
 
न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते.
 
पंडीतराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : रघुनाथराव पंडीत. हे धर्मखात्याचे प्रमुख होते
 
मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली जाई. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रीपद देण्यास महाराजांचा विरोध होता.
 
Infrastructure developement helps to grow countries economy हा मुलभूत मंत्र महाराजांना ठावूक होता महाराजांनी अनेक तळी बंधारे बांधले . आपणास नरवीर तानाजी मालुसरे "गड आला पण सिंह गेला " ह्या उक्ती साठी माहित असतील ह्याच तानाजी मालुसारेंना महाराजांनी २ वर्षे कोंकणात रस्ते बांधणीचं काम दिलं होतं कारण दळणवळण पण तितकंच महत्वाचं आहे ह्याची महाराजांना कल्पना होती 
 
शिवाजी महाराज पहिले राज्यकर्ते आहेत ज्यांनी प्रथम ठराविक वेतनाची पद्धत निर्माण केली प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या दर्जा प्रमाणे मासिक अथवा वार्षिक वेतन मिळत असे. शिलेदारांचा पगार दरमहा ६ ते १२ होन असे, बारागीरांचा पगार ५ ते ७ होन असे अश्याच प्रकारे अष्टप्रधान मंडळातील सर्वोच्य मंत्र्यांना सुद्धा ठरवलेलं वार्षिक वेतन मिळे 
 
(शिवकालीन चलनास होन म्हणत असत. होन ही सुवर्णाची मुद्रा होती.या मुद्रेचे वजन सुमारे २.७ ते २.९ ग्राम एवढे होते)
 
त्याच प्रमाणे महाराजांनी वतनदारी पद्धत पूर्ण पणे बंद केली, जमिनीचा पोत बघून सर वसुलीची पद्धत सुरु केली , शेतकऱ्यांना बी बियाणा साठी कर्जे देवू केली आणि त्याची वसुली सुलभ हप्त्यामध्ये केली 
असे नानाविधी जनतेच्या कल्याणासाठी चे उपकर्म महाराजांनी सुरु केले होते. 
 
आज अशा ह्या जाणत्या राजाचा राज्याभिषेक सोहळा साजरा करताना आजच्या राज्यकर्त्यांनी महाराजांना गो-ब्राह्मण प्रतिपालक पदवी होती कि नाही किंवा महाराजांचे स्मारक समुद्रात बांधायचे कि नाही अशा  भावनिक गोष्टी उकरून न काढता महारजांच्या अंगीचे गुण आत्मसात करून जनतेच्या कल्याणाची कामे करावीत हीच महाराजांना खरी मानवंदना असेल 
 
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 
 
जय भवानी जय शिवाजी
 
___________________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे
zemasekk @gmail.com 

No comments: