आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
चैत्र शुक्ल प्रतिपदा शके १९३६, हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत ह्या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे होत असतात त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. पण आजची तीथ काय आहे किंवा हे कोणते शके आहे हे पटकन ध्यानी येत नाही .
एक सरळ उपाय आहे. शालिवाहन शक इसवीसन ७८ मध्ये सुरु झाला म्हणजे आजच्या इंग्रजी वर्षातून ७८ वजा केले कि शालिवाहन शके मिळतात म्हणूनच २०१४ - ७८ = १९३६ तर आज शके १९३६ सुरु झाला त्याच प्रमाणे विक्रम संवत हे इसवीसन पूर्वी ५७ वर्षे आधी सुरु झाला म्हणजेच सध्या २०७१ विक्रम संवत वर्ष सुरु होणार. दोन्ही हि संवत शक आणि कुशाण ह्यांच्या वरील विजयाचे प्रतिक आहेत.
ह्या संवताच्या उत्पत्ती विषयी सांगण्या आधी ज्यांच्या वरील विजयामुळे हे संवत प्रसिद्ध झाले त्या शक आणि कुशाणा विषयी थोडक्यात माहिती
शक आणि कुशाण :
इसवीसनाच्या काही वर्षे आधी आणि सुरुवातीला भारतावर भयंकर आणि व्यापक असे शक आणि कुशाणाचे परचक्र चालून आले. मध्य आशिया मध्य शकांच्या रानटी टोळ्या होत्या आणि त्याच्या पुढील विस्तीर्ण प्रदेशात कुशाणाच्या रानटी टोळ्या होत्या आणि त्याही पलीकडे चीन देशाच्या आसपास हूण टोळ्यांच्या वस्ती होत्या. ह्या सर्व टोळ्या अतिशय क्रूर होत्या . चीनची जी जगप्रसिद्ध भिंत आहे ती ह्याच हूण टोळ्यांपासून संरक्षणासाठी बांधली होती . ह्या तीनही टोळ्यांमध्ये तुमुल वैर होते. हूण लोकांनी शक आणि कुशाणाची वस्तीवर चाल करून त्यांना पश्चिमेकडे लोटले . शकांनी त्यांच्या पश्चिमेकडे असणाऱ्या ग्रीक राज्यांवर आक्रमण करून त्यांची दाणादाण उडवली पुढे ह्याच टोळ्यांची एका मागून एक भारतावर आक्रमणे होत होती
शालिवाहन शके :
शालिवाहन शकाच्या उत्पत्ती विषयी इतिहासकारांचे दोन मतप्रवाह आहेत. पहिल्या मताचे पुरस्कर्ते म्हणतात कि कुशाणानी जेंव्हा भारतावर आक्रमण केलं आणि कुशाणांचा पहिला राजा विमा क्याडफायसेस ज्यास आपले लोक शकच म्हणतात हा इ.स. ७८ मध्य राज्यावर बसला आणि त्याने हा शक सुरु केला परंतु काही इतिहासकारांच्या मते कुशाणांचा दुसरा राजा कानिश्क हा इ.स. ७८ मध्ये राज्यावर बसला आणि त्याने हा शक सुरु केला . पुढे पैठणच्या शालिवाहन सम्राटांनी जेंव्हा शकांना पादाक्रांत केलं तेंव्हा आपल्या विजयाच्या स्माराकार्थ ह्याच शकाल शालिवाहन शक हे नाव दिले.
विक्रम संवत :
विक्रम संवतच्या उत्पत्ती विषयी हि इतिहासकारांत एकमत नाही शकांचा एक राजा ओझोझ पहिला त्याने इसविसन पूर्वी ५७ व्या वर्षी त्याचा म्हणून एक संवत सुरु केला त्यालाच पुढे गुप्तवंशीय सम्राट विक्रमादित्य याने शक कुशाणांचा उच्छेद केला तेंव्हा पासून लोक विक्रम संवत म्हणून म्हणू लागले
विक्रम संवत आणि शालिवाहन संवत ह्या दोनही राष्ट्रीय संवताचा संबध भारतीयांनी शक-कुशाणा वर जे विजय मिळवले त्यांच्याच स्मृतीगौरवाशी आहे आणि गुढीपाडवा हे नुसते मराठी नववर्ष नसून समस्त हिंदू नववर्ष आहे .
___________________________________________________________________________________
किशोर केशव झेमसे
zemasekk @gmail.com
4 comments:
जय शिवराय
खूप छान बंधूराज …
जय शिवराय
खूप छान बंधूराज …
खरंच फार चांगल्या आणि सोप्प्या पद्धतीने माहिती दिली आहे. संपूर्ण माहिती वाचताना कोठेही कंटाळा आला नाही.
- सचिन पिळणकर
www.avakashvedh.com
Nice...short and simple..
Post a Comment