Friday, 5 April 2013

इतिहासातून दोन शब्द - १. प्रस्तावना

    " इतिहास " तसं  रूढार्थाने रुक्ष विषय खुप साऱ्या सनावल्या, ऐतिहासिक टिपणं किंवा मग मनोरंजक गोष्टी पण त्या पलीकडे इतिहासातून बराच काही शिकायला मिळत, माहिती मिळते, अनुभव मिळतो ज्याचा उपयोग वर्तमानात केला तर भविष्य नक्कीच  उज्जवल असेल. 
 
     आठवत नाही इतिहास वाचनाची आवड कधी निर्माण झाली, शालेय जीवनात नक्कीच एस पी देव सरांमुळे इतिहासाबद्दल गोडी लागली पण मुख्यतः एक स्कोरिंग विषय असाच दृष्टीकोन होता. 
 
     तसं इतिहास म्हंटल कि मराठी माणसाला पहिली आठवण होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज . हिंदुस्तानच्या इतिहासातील एक सुवर्ण पानच आहे ते. मला पण इतिहास बदल ची आवड ऐतिहासिक कादंबरी वाचनानेच झाली. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपति मनात कोरून बसलं. श्रीमंत माधवराव पेशव्यांवरील "स्वामी", शिवाजी सावंत लिखित "छावा", "पानिपत" वाचताना मराठ्यांचा पराभव मनाला चटका लावून जातो. अश्या अनेक ऐतिहासिक कादंबरी वाचताना एके दिवशी सरदेसाई लिखित "मराठी रियासत" हाती आलं आणि मराठेशाहीच्या इतिहासाचा खजिना हाती लागला आणि मग इतिहासाकडे निव्वळ गोष्टी म्हणुन न पाहता त्यातील अंतरंग पाहण्याची आवड निर्माण झाली त्याच वाचनाचा सारांश लिहिण्याचा हा प्रयत्न. 
 
    इतिहास वयाक्तिक किंवा सामाजिक घडामोडींकडे macro नजरेने बघायला शिकवतो . अशा वर्तमानातील दैनदिन घडामोडींचे किंवा समाजाच्या / देशाच्या strategy चे भविष्यात काय परिणाम होतील ते इतिहासतील आरश्य कडे पहिले तर समजू शकेल. current strategy चे अवगुण वर्तमानात दिसत नाही पण भविष्यात त्याचे दुष्परिणाम भयंकर असतात हे मराठ्यांचा इतिहास वाचताना जाणवत. छत्रपती शिवाजी  महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोविली, त्या छोट्याश्या स्वराज्याला पेशव्यांनी अखंड हिंदुस्तानात पसरवलं पण शिवशाही म्हटलं कि रामराज्य  आठवत पण पेशवाईला तो आदर, मानसन्मान का मिळत नाही हा प्रश्न मनाला पडायचं आणि त्याचा उत्तर महाराजांच्या आणि पेशव्यांच्या motive मध्ये मिळालं.  महाराजांनी जीवावर उदार होऊन युद्ध्ये खेळली ते हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, पेशव्यांनी सुद्धा असंख्य युद्ध्ये जिंकत हिंदुस्तान पादाक्रांत केला पण त्यांचा युद्ध्ये जिंकण्यामागचा  उद्देश मुख्यत्वे स्वतः वरील कर्जे फेडणे हा असायचा, ह्याचा परिणाम देशाभिमान हळू हळू कमी होत गेला परिणामतः बलाढ्य मराठी साम्राज्य मुठभर इंग्रजांच्या हाती गेलं . 
          प्राचीन इतिहास वाचताना पण असं काही लक्षात येतं . सम्राट अशोक बद्दल नक्कीच आदर आहे आणि त्यांचा कार्य पण महान आहे. पण एक गोष्ट जाणवते सम्राट अशोकाने बोद्ध धर्म आणि बोद्ध धर्माची शिकवण अहिंसा ह्याचा अंगीकार आणि प्रचार करताना सैन्यबळ वाढवण्याकडे दुर्लक्ष केलं आणि राष्ट्राच्या सीमांचं शत्रूपासून रक्षण सशस्त्र सैन्यच करु शकत हि चाणक्य नीती विसरला पुढे अशोकाच्या उत्तराधीकार्यांनी सुद्धा तीच परंपरा कायम ठेवली आणि अंत्यथा मौर्य साम्राज्य समाप्त झालं 
 
        त्याचप्रमाणे हल्ली जे वोट बँक आणि भ्रष्टाचारच गलिछ राजकारण सुरु आहे त्याचे भविष्यात देशाला काय परिणाम भोगावे लागणार आहेत देव जाणो. वर्तमानात नकळत झालेल्या चुका जेंव्हा इतिहास बनतात तेंव्हा त्यांना माफी नसते आणि त्या पेक्षा वाईट म्हणजे त्या पुन्हा सुधारता येत नहित. इतिहासाकडे डोळस नजरेने पाहिलं  तर वयक्तिक अथवा सामाजिक वर्तमान सुदृड  राहील आणि पर्यवसन उज्ज्वल  भविष्यात होइल. 
 
    प्रस्तावना  लांबत  चालली आहे. शिवाजी महाराजांबद्दल वाचू आणि लिहू तेवढं  कमीच आहे. थोडा फार जे काही वाचन झाला आहे त्याचा सारांश लिहायचाच आहे  त्याच बरोबर आपल्या देशाला हजारो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. रामायण महाभारत हे पौराणिक आद्यकाव्य समजलं तरी ख्रिस्तपूर्व हजार वर्षापूर्वीचा मगध आणि ताक्षशिलेतला प्राचीन लिखित इतिहास आहे. त्याच् पण वाचन करायच आहे. पण ब्लोग ची सुरुवात मात्र श्री छत्रपति शिवाजी महाराजंच्या थोडक्यात माहितीने करावी.

प्रस्तावनेच्या शेवटी इतकंच सांगायचं आहे "जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो …"
 
 
___________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे 

1 comment:

Alps Alive said...

Wowwwwwwwwwwwwwwww
Kz... Thanks Very much for writing... Loved to read it. And this blog is especially imp for ppl like me.. who have failed in Histry n school times and use to hate histry.

You blog is of lot of use for me.

Pls keep writing.