Friday, 5 April 2013

इतिहासातून दोन शब्द - २. मराठेशाही वंशावळ

             शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दि. ६ जून १६७४  रोजी रायगडावर झाला आणि महाराज छत्रपति झाले, मराठी साम्राज्याची स्थापना झाली आणि सन १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसर्या बाजीराव पेशव्यांचा पराभव केला आणि मराठेशाहीचा अंत झाला. असं जवळपास दीड शतक (१५० वर्षे) मराठ्यांनी तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर राज्य केल. 
 
 
          ह्या दीड शतकातील मराठेशाही दोन खंडात बघता येइल. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी ने संभाळल आणि दुसरा खंड ह्या स्वराज्याच्या पेशव्यांनी साम्राज्यात केलेला विस्तार 
 
     बऱ्याच जणांना शिवाजी महाराजांच्या मुलांची नावं विचारली तर संभाजी महाराजांचं नाव पटकन सांगता येतं पण राजाराम महाराज माहित नसतात तसच पेशव्यांच्या  बाबतीत घडतं. शिवाजी महाराज आणि पेशव्यांची वंशावळ थोडक्यात बघु. तत्पूर्वी शिवाजी महाराज्यांच्या कुळाविषयी 
 
    भोसले घराणे मूळचे राजस्थानातील मेवाड मधले मुळ नाव सिसोद्याचे राणा . सन  १३०३ मध्ये दिल्ली चा सुलतान अलाउद्दीन खिलजी याने मेवाड वर स्वारी केली आणि चितोडच्या किल्यास वेढा घालून ते राज्य काबीज केलं 
 ह्या संग्रामात सिसोद्याचा राणा लक्ष्मणसिंह धारातीर्थी पतन पावले लक्ष्मणसिंह चे सात मुलगेही त्याज  बरोबर मारले गेले . एक मुलगा अजयसिंह जिवंत राहिला तो पुढे सिसोद्याचा राणा  झाला अजयसिंहास  दोन मुले सजनसिंह व दुसरा क्षेमसिंह. अजयसिंह ने आपल्या पाश्च्यात पुतण्या हमीर यास गादीवर  बसविले. त्यामुळे नाराज होऊन हे दोन बंधू राजपुतान्यातून   दक्षिणेकडे आले . त्यांच्या पासून पुढे भोसले आणि घोरपडे ह्या घराण्याची उत्पत्ती झाली 
 
सजनसिंह १३५२ मध्य मरण पावला . त्याचा पाचवा वंशज उग्रसेन, त्यास दोन पुत्र मोठा कर्णसिंह व धाकटा शुभकृष्ण. कर्णसिंह  व त्याचा पुत्र भीमसिंह खेळणा  किल्ला घेण्यास गेले असता त्यांनी घोरपड लावून किल्ला हस्तगत केला, कर्णसिंह  संग्रामात मृत्यू पावल्या मुळे  त्याचा पुत्र भीमसिंह ह्यास "राजा घोरपडे बहाद्दूर" हा किताब व मुधोळ जवळ जागीर दिली  तेंव्हा पासून  भीमसिंहाचे  वंशज घोरपडे आडनाव प्राप्त होऊन मुधोळास  रहिले. 
 
कर्णसिंहाचा भाऊ शुभकृष्ण हा दौलताबाद जवळील वेरूळ वतनाचा मालक होऊन त्याचे वंशास भोसले हे नाव प्राप्त झाले. शुभकृष्णाचा तिसरा वंशज बंबाजी भोसले. या वरून लक्षात येईल मुधोळकर घोरपडे आणि भोसले हे सिसोदे येथील राणा वंशाच्या दोन शाखा आहेत. घोरपड्यानी मुसलमानाच्या ताबेदारीत धन्यता मानली आणि भोसल्यांनी मुसलमानाचा पाडाव करून स्वतंत्र राज्य स्थापले ह्या वरूनच भाऊबंदकीचे कलह कायमचे रहिले. 
 
बंबाजी ला दोन मुले मालोजी व विठोजी, दोघेही पराक्रमी निपजले. मालोजी ची बायको उमाव्वा हि फलटण च्या जगपाळ निंबळकराची बहीण. मालोजी व उमाव्वा ला दोन मुले शहाजी व शरीफजी 
 
शहजीचे लग्न सिंदखेड च्या जाधवरावांच्या जिजाबाईशी झाले. रामाच्या सुर्यवंशातील शहाजी व कृष्णाच्या यादव कुलीन जिजाबाई ला दोन मुले झाली मोठा संभाजी आणि धाकटा शिवाजी. 
 
३ ० ० वर्षाच्या अंधाऱ्या पारतंत्र्यातून स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीय शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३०  साली झाला 
 
                                                                   

    
 
 पेशवाई : बहुतांश लोकांना वाटतं पहिला पेशवा बाळाजी  विश्वनाथ किंवा बाजीराव पेशवे. खरतर पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद - पंतप्रधान . महाराजांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा पंप्रधान होते मोरोपंत पिंगळे पुढे संभाजी पुत्र शाहू महाराज छत्रपतींच्या गाडीवर बसले तेंव्हा श्रीवर्धन चे बाळाजी विश्वनाथ भट स्व:कर्तुत्वावर पेशवा बनले. तो पर्यंत पेशवे किंवा पंतप्रधान पद हे वारसा हक्काने मिळणारे नव्हत. मराठेशाही चा मुख्य कारभार साताऱ्या च्या छत्रपतींच्या गादी  कडून पेशव्यांच्या पुण्यात ह्याच दरम्यान आला . त्याला एक मुख्य कारण म्हणजे शाहू महाराज लहानपणापासून औरंगझेबाच्या कैदेत होते त्यांचे शिक्षण पण मुघल दरबारीच झाला त्या मुळे त्यांच्या आधीच्या महाराजां प्रमाणे तितकंसं युद्ध कौशल्य नव्हत. आणि पेशवेपद बाजीराव सारख्या पराक्रमी व्यक्ती कडे आलं  आणि हिंदुस्तानचे सत्ता केंद्र पुण्यातील शनिवार वाडा बनलं 
 
पेशव्यांची वंशावळ (पेशवाई पद कालावधी )
 
 

  
विश्वासराव आणि सदाशिवभाऊ हे पानिपतच्या लढाई मध्ये धरतार्थी पडले 
रघुनाथराव उर्फ राघोबादादांनी इंग्रजांच्या मदतीने काही काळ पेशवेपद मिळवलं होतं. 
 
साताऱ्यातील छत्रपतींच्या वतीने पेशवे मराठेशाहीचा राज्यकारभार बघायचे .  
 
 
 
___________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे 

 

1 comment:

Unknown said...

भोसले व घोरपडे हे उत्तरेतून दक्षिणेत आले हे आपण कुठल्या आधारावर मांडले आहे त्याचे संदर्भ काय आहेत या संबंधित थोडी माहिती द्यावी दक्षिणेतील प्राचीन राजवंश होते जसे की सातवाहन चालुक्य वाकाटक राष्ट्रकूट इत्यादी त्यापैकीच वरील घोरपडे हे चोळ राजवंशाचे आहेत अशी काही कागदपत्र उपलब्ध आहेत व भोसले घराणे हे देखील दक्षिणेतील ह्या प्राचीन राजवंश यापैकी एक असण्याची शक्यता नाकारता येत नाही कृपया आपण अधिक मार्गदर्शन करावे