आपल्या भारताचा इतिहास तसं पहिल तर पाच ते दहा हजार वर्षे प्राचीन आहे. रामायण महाभारत हे मुख्यतः पुराणकाळातील जीवनवृतांत आहे आणि त्यावर दंतकथेची, दैवीकरणाची आणि लाक्षणिक वर्णनांची आच्छादन आहेत. आपले पुराण आणि पौराणिक ग्रंथ एक भव्य भांडार आहे. पण पुराणे म्हणजे निर्भेळ इतिहास नव्हे.
इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनांचे नि घटनांचे स्थळ नि काल हि जवळ जवळ निश्चितीने सांगता आली पहिजे. ख्रिस्तपूर्व जवळपास ५०० वर्षे पूर्वी चा मगध, तक्षशीला येथील बुध्द पूर्व इतिहासाचं वर्णन अनेक ग्रंथ आणि शिलालेखातून आढळून येतं .
ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षापूर्वी म्हणजे जवळपास २५०० वर्षापूर्वी उत्तर भारतात १६ महाजनपद होती. ह्या महाजनपदांमध्ये दोन प्रकारची राज्यपद्धती होती. काही राजेशाही होती आणि काही गणराज्ये होती .
राजेशाही पद्धती मध्ये वारसाहक्काने राजगादी मिळत असे आणि गणराज्यांमध्ये तेथील प्रजा राज्याचे प्रमुख नेमत असे. एका प्रकारे हल्ली जी लोकशाही आहे ती २५०० वर्षापूर्वी भारतामध्ये काही राज्यात नांदत होती. शाक्य , अंग , भागा , कुशीनगर, पावा, पिप्पालीवन, मिथिला, वैशाली हि महत्वाची गणराज्ये होती
त्याचप्रमाणे कोसला, वत्स्त , अवंती आणि मगध हि महत्वाची राजेशाही अस्तित्वात होती. पुढे मगधच्या नंद सम्राटांनी सर्वांचा पराभव करून मोठ साम्राज्य उभारलं .
मगध साम्राज्य:
"बिंबिसार" हा मगध चा पहिला महत्वाचा सम्राट. त्याचा मुलगा "अजातशत्रू" ह्याने मगध साम्राज्यावर इसवीसन पूर्व ४९३ ते ४६१ मध्ये राज्य केलं . पाटलीपुत्र किंवा सध्याची पाटना हि त्याची राजधानी होती.
अजातशत्रू नंतर त्याचा मुलगा "नंद" मगध सम्राट झाला, ह्याच नंद सम्राटा कडे आर्य चाणक्य दानाध्यक्ष होता आणि चंद्रगुप्त मौर्य ने नंद राजाच्या शिरच्छेद करून मगध ला नंद सम्राटाच्या जाचातून मुक्त केलं. इसवीसन पूर्व 3२० च्या जवळपास नंद सम्राटाच मगध वर राज्य होतं आणि त्याच दरम्यान रोमन सम्राट अलेक्झांडर ची भारतावर स्वारी झाली होती.
मौर्य साम्राज्य:
मगध सम्राट नंद चा आर्य चाणक्य च्या मदतीने पराभव करून चंदगुप्त मौर्य मगध सम्राट झाला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. चंद्रगुप्त आणि मोर्य साम्राज्य बद्दल बराच काही लिहिण्या सारखा आहे सध्या तरी थोडक्यात .
चंद्रगुप्त मौर्याने इसविसन पूर्व ३२४ ते २९७ पर्यंत राज्य केलं. पुढे त्याचा मुलगा बिंदुसार मौर्य सम्राट झाला . त्याच्या पश्चात बिंदुसर चा मुलगा अशोक इसविसन पूर्व २७३ मध्ये सम्राट झाला. हा इतिहास वाचताना समजला सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य चा नातू .
सातवाहन :
मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर जवळ पास इसविसन पूर्व १०० च्या आसपास सातवाहन राज्यकर्ते झाले गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राज्याकार्त्यातील सर्वात प्रसिद्ध राजा . त्याने इसविसन ७५ ते ९५ पर्यंत राज्य केलं. इसवीसनाच्या सुरुवातीला शक आणि कुशाणांचे आक्रमण झाले ह्याच गौतमीपुत्र सातकर्णी शकांचा मोठा पराभव केला होता.
गुप्त साम्राज्य :
इसविसन ३१९ ते ३२४ मध्ये चंद्रगुप्त सम्राट झाला . चंद्रगुप्त मोर्य आणि हा चंद्रगुप्त ह्यांच्यातील नाव साधर्म्य मुले थोडी गफलत होते. हा चंद्रगुप्त गुप्त साम्राज्याचा संस्थापक
. गुप्त साम्राज्य हे भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ होता ह्याच काळात कला, शास्त्र , गणित , वैद्यक इत्यादी विषयांची भरभराट झाली थोर गणितज्ञ आर्यभट्ट हा गुप्त काळातीलच ज्याने शून्याचा शोध लावला
आयुर्वेदातील पारंगत धन्वंतरी सुधा गुप्त कळतीलच
सन ३२५ ते ३७५ मध्ये चंद्रगुप्त चा मुलगा समुद्रगुप्त सम्राट झाला, हा सुधा अति पराक्रमी होता दिल्ली चा जो कुतुबमिनार आहे तो खरा कुतुबुद्दीन ने न बांधता समुद्रगुप्त ने बांधला होता पण मुघलांनी जसे अनेक मंदिरे आणि कलाकृती ची नावे बदलून स्वतःची म्हणून सांगितली तसाच हा कुतुबमिनार आता तरी कुतुबमिनार चा नाव बदलून त्याचा खरा करता समुद्रगुप्त आहे हे सांगितले पहिजे.
जवळपास ३ ० ० वर्षे गुप्त साम्राज्य अस्तिवात होतं आणि सहाव्या शतकाच्या अखेरीस गुप्त साम्राज्याच पतन झालं
गुप्त साम्राज्याच्या पतन नंतर भारतात एकसूत्री राज्य नव्हतं सहाव्या शतका नंतरची काही साम्राज्ये अशी होती
- वर्धन साम्राज्य - राजा हर्षवर्धन
- चालुक्य साम्राज्य
- छोल साम्राज्य
- राष्ट्रकुट साम्राज्य
- राजा भोज
अशा प्रकारे संक्षिप्त रुपात ख्रिस्तपूर्व ५ ० ० ते इसविसन दहाव्या शतका पर्यंत भारताचा समृद्ध प्राचीन इतिहास सांगता येईल . सध्या तरी इथेच थांबवतो
__________________________________________________________________________________
किशोर केशव झेमसे
zemasekk @gmail .com
2 comments:
खूप छान माहिती थोडक्यात पण महत्वाची
Post a Comment