Thursday, 11 April 2013

इतिहासातून दोन शब्द - ४. हिंदू कालगणना (शके / विक्रम संवत)


          आज गुढीपाडवा, हिंदू नववर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!
 
चैत्र शुक्ल प्रतिपदा शके १९३६, हिंदूकालगणनेत शालिवाहन शक आणि विक्रम संवत ह्या दोन संवताला महत्वाचे स्थान आहे. दैनंदिन जीवनात आपण इंग्रजी तारीख वापरतो पण सण समारंभ हिंदू तिथी नुसारच साजरे  होत असतात त्यात सुद्धा आपण शालिवाहन शकाचा काळगणने साठी जास्त वापर करतो. पण आजची तीथ  काय आहे किंवा हे कोणते शके आहे हे पटकन ध्यानी येत नाही . 
 
एक सरळ उपाय आहे. शालिवाहन शक इसवीसन  ७८ मध्ये सुरु झाला म्हणजे आजच्या इंग्रजी वर्षातून ७८ वजा केले कि शालिवाहन शके मिळतात म्हणूनच २०१४ - ७८ = १९३६ तर आज शके १९३६ सुरु झाला त्याच प्रमाणे विक्रम संवत हे इसवीसन पूर्वी ५७ वर्षे आधी सुरु झाला म्हणजेच सध्या २०७१ विक्रम संवत वर्ष सुरु होणार. दोन्ही हि संवत शक आणि कुशाण ह्यांच्या वरील विजयाचे प्रतिक आहेत.
 
ह्या संवताच्या उत्पत्ती विषयी सांगण्या आधी ज्यांच्या वरील विजयामुळे हे संवत प्रसिद्ध झाले त्या शक आणि कुशाणा विषयी थोडक्यात माहिती 
 
शक आणि कुशाण :
 
इसवीसनाच्या काही वर्षे आधी आणि सुरुवातीला भारतावर भयंकर आणि व्यापक असे शक आणि कुशाणाचे परचक्र चालून आले. मध्य आशिया मध्य शकांच्या रानटी टोळ्या होत्या आणि त्याच्या पुढील विस्तीर्ण प्रदेशात कुशाणाच्या रानटी टोळ्या होत्या आणि त्याही पलीकडे चीन देशाच्या आसपास हूण टोळ्यांच्या वस्ती होत्या. ह्या सर्व टोळ्या अतिशय क्रूर होत्या . चीनची जी जगप्रसिद्ध भिंत आहे ती ह्याच हूण टोळ्यांपासून संरक्षणासाठी बांधली होती . ह्या तीनही टोळ्यांमध्ये तुमुल वैर होते. हूण लोकांनी शक आणि कुशाणाची वस्तीवर चाल करून त्यांना पश्चिमेकडे लोटले . शकांनी त्यांच्या पश्चिमेकडे असणाऱ्या ग्रीक राज्यांवर आक्रमण करून त्यांची दाणादाण उडवली पुढे ह्याच टोळ्यांची एका मागून एक भारतावर आक्रमणे  होत होती 
 
शालिवाहन शके :
 
शालिवाहन शकाच्या उत्पत्ती विषयी इतिहासकारांचे दोन मतप्रवाह आहेत. पहिल्या मताचे पुरस्कर्ते म्हणतात कि कुशाणानी जेंव्हा भारतावर आक्रमण केलं आणि कुशाणांचा पहिला राजा विमा क्याडफायसेस  ज्यास आपले लोक शकच म्हणतात हा इ.स. ७८ मध्य राज्यावर बसला आणि त्याने हा शक सुरु केला परंतु काही इतिहासकारांच्या मते कुशाणांचा दुसरा राजा कानिश्क हा इ.स. ७८ मध्ये राज्यावर बसला आणि त्याने हा शक सुरु केला . पुढे पैठणच्या शालिवाहन सम्राटांनी जेंव्हा शकांना पादाक्रांत केलं  तेंव्हा आपल्या विजयाच्या स्माराकार्थ  ह्याच शकाल शालिवाहन शक हे नाव दिले. 
 
विक्रम संवत :
 
विक्रम संवतच्या उत्पत्ती विषयी हि इतिहासकारांत एकमत नाही शकांचा एक राजा ओझोझ पहिला त्याने इसविसन पूर्वी ५७ व्या वर्षी त्याचा म्हणून एक संवत सुरु केला त्यालाच पुढे गुप्तवंशीय सम्राट विक्रमादित्य याने शक कुशाणांचा उच्छेद केला तेंव्हा पासून लोक विक्रम संवत म्हणून म्हणू लागले 
 
विक्रम संवत आणि शालिवाहन संवत ह्या दोनही राष्ट्रीय संवताचा संबध भारतीयांनी शक-कुशाणा वर जे विजय मिळवले त्यांच्याच स्मृतीगौरवाशी आहे आणि गुढीपाडवा हे नुसते मराठी नववर्ष नसून समस्त हिंदू नववर्ष आहे . 
 
 
___________________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे
zemasekk @gmail.com  

Tuesday, 9 April 2013

इतिहासातून दोन शब्द - ३. प्राचीन साम्राज्ये

        आपल्या भारताचा इतिहास तसं पहिल तर पाच ते दहा हजार वर्षे प्राचीन आहे. रामायण महाभारत हे  मुख्यतः पुराणकाळातील जीवनवृतांत आहे आणि त्यावर दंतकथेची, दैवीकरणाची आणि लाक्षणिक वर्णनांची आच्छादन आहेत. आपले पुराण आणि पौराणिक ग्रंथ एक भव्य भांडार आहे. पण पुराणे म्हणजे निर्भेळ इतिहास नव्हे. 
 
       इतिहासाचे मुख्य लक्षण म्हणजे त्यातील वर्णनांचे नि घटनांचे स्थळ नि काल हि जवळ जवळ निश्चितीने सांगता आली पहिजे. ख्रिस्तपूर्व जवळपास ५०० वर्षे पूर्वी चा मगध, तक्षशीला येथील बुध्द पूर्व इतिहासाचं वर्णन अनेक ग्रंथ आणि शिलालेखातून आढळून येतं . 
 
      ख्रिस्तपूर्व पाचशे वर्षापूर्वी म्हणजे जवळपास २५०० वर्षापूर्वी उत्तर भारतात १६ महाजनपद होती. ह्या महाजनपदांमध्ये दोन प्रकारची राज्यपद्धती होती. काही राजेशाही होती आणि काही गणराज्ये होती .
    राजेशाही पद्धती मध्ये वारसाहक्काने राजगादी मिळत असे आणि गणराज्यांमध्ये तेथील प्रजा राज्याचे प्रमुख नेमत असे. एका प्रकारे हल्ली जी लोकशाही आहे ती २५०० वर्षापूर्वी भारतामध्ये काही राज्यात नांदत होती. शाक्य , अंग , भागा , कुशीनगर, पावा, पिप्पालीवन, मिथिला, वैशाली हि महत्वाची गणराज्ये होती 
   
    त्याचप्रमाणे कोसला, वत्स्त , अवंती आणि मगध हि महत्वाची राजेशाही अस्तित्वात होती. पुढे मगधच्या नंद सम्राटांनी सर्वांचा पराभव करून मोठ साम्राज्य उभारलं . 
 
मगध साम्राज्य:
 
"बिंबिसार" हा मगध चा पहिला महत्वाचा सम्राट. त्याचा मुलगा "अजातशत्रू" ह्याने मगध साम्राज्यावर इसवीसन पूर्व ४९३ ते ४६१ मध्ये राज्य केलं . पाटलीपुत्र किंवा सध्याची पाटना हि त्याची राजधानी होती. 
 
अजातशत्रू नंतर त्याचा मुलगा "नंद" मगध सम्राट झाला, ह्याच नंद सम्राटा कडे आर्य चाणक्य दानाध्यक्ष होता आणि चंद्रगुप्त मौर्य ने नंद राजाच्या शिरच्छेद करून मगध ला नंद सम्राटाच्या जाचातून मुक्त केलं. इसवीसन पूर्व 3२० च्या जवळपास नंद सम्राटाच मगध वर राज्य होतं  आणि त्याच दरम्यान रोमन सम्राट अलेक्झांडर ची भारतावर स्वारी झाली होती. 
 
मौर्य साम्राज्य:
 
        मगध सम्राट नंद चा आर्य चाणक्य च्या मदतीने पराभव करून चंदगुप्त मौर्य मगध सम्राट झाला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना झाली. चंद्रगुप्त आणि मोर्य साम्राज्य बद्दल बराच काही लिहिण्या सारखा आहे सध्या तरी थोडक्यात . 
 
चंद्रगुप्त मौर्याने इसविसन पूर्व ३२४ ते २९७ पर्यंत राज्य केलं. पुढे त्याचा मुलगा बिंदुसार मौर्य सम्राट झाला . त्याच्या पश्चात बिंदुसर चा मुलगा अशोक  इसविसन पूर्व २७३ मध्ये सम्राट झाला. हा इतिहास वाचताना समजला सम्राट अशोक हा चंद्रगुप्त मौर्य चा नातू . 
 
सातवाहन :
 
मौर्य साम्राज्याच्या पतना नंतर जवळ पास इसविसन पूर्व १००  च्या आसपास सातवाहन राज्यकर्ते झाले गौतमीपुत्र सातकर्णी ह्या सातवाहन राज्याकार्त्यातील सर्वात प्रसिद्ध राजा . त्याने इसविसन ७५ ते ९५ पर्यंत राज्य केलं. इसवीसनाच्या सुरुवातीला शक आणि कुशाणांचे आक्रमण झाले ह्याच गौतमीपुत्र सातकर्णी शकांचा मोठा पराभव केला होता. 
 
गुप्त साम्राज्य :
 
इसविसन ३१९ ते ३२४ मध्ये चंद्रगुप्त सम्राट झाला . चंद्रगुप्त मोर्य आणि हा चंद्रगुप्त ह्यांच्यातील नाव साधर्म्य मुले थोडी गफलत होते. हा चंद्रगुप्त गुप्त साम्राज्याचा संस्थापक 
 
. गुप्त साम्राज्य हे भारतीय इतिहासातील सुवर्ण काळ होता ह्याच काळात कला, शास्त्र , गणित , वैद्यक इत्यादी विषयांची भरभराट झाली थोर गणितज्ञ आर्यभट्ट हा गुप्त काळातीलच ज्याने शून्याचा शोध लावला 
आयुर्वेदातील पारंगत धन्वंतरी सुधा गुप्त कळतीलच 
 
सन ३२५ ते ३७५ मध्ये चंद्रगुप्त चा मुलगा समुद्रगुप्त सम्राट झाला, हा सुधा अति पराक्रमी होता दिल्ली चा जो कुतुबमिनार आहे तो खरा कुतुबुद्दीन ने न बांधता समुद्रगुप्त ने बांधला होता पण मुघलांनी जसे अनेक मंदिरे आणि कलाकृती ची नावे बदलून स्वतःची म्हणून सांगितली तसाच हा कुतुबमिनार आता तरी कुतुबमिनार चा नाव बदलून त्याचा खरा करता समुद्रगुप्त आहे हे सांगितले पहिजे. 
 
जवळपास ३ ० ० वर्षे गुप्त साम्राज्य अस्तिवात होतं आणि सहाव्या शतकाच्या अखेरीस गुप्त साम्राज्याच पतन झालं 
 
गुप्त साम्राज्याच्या पतन नंतर भारतात एकसूत्री राज्य नव्हतं  सहाव्या शतका नंतरची काही साम्राज्ये अशी होती 
 
  • वर्धन साम्राज्य - राजा हर्षवर्धन
  • चालुक्य साम्राज्य
  • छोल साम्राज्य 
  • राष्ट्रकुट साम्राज्य 
  • राजा भोज 
 
अशा प्रकारे संक्षिप्त रुपात ख्रिस्तपूर्व ५ ० ० ते इसविसन दहाव्या शतका पर्यंत भारताचा समृद्ध प्राचीन इतिहास सांगता येईल . सध्या तरी इथेच थांबवतो 
 
 
__________________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे 
zemasekk @gmail .com 

Friday, 5 April 2013

इतिहासातून दोन शब्द - १. प्रस्तावना

    " इतिहास " तसं  रूढार्थाने रुक्ष विषय खुप साऱ्या सनावल्या, ऐतिहासिक टिपणं किंवा मग मनोरंजक गोष्टी पण त्या पलीकडे इतिहासातून बराच काही शिकायला मिळत, माहिती मिळते, अनुभव मिळतो ज्याचा उपयोग वर्तमानात केला तर भविष्य नक्कीच  उज्जवल असेल. 
 
     आठवत नाही इतिहास वाचनाची आवड कधी निर्माण झाली, शालेय जीवनात नक्कीच एस पी देव सरांमुळे इतिहासाबद्दल गोडी लागली पण मुख्यतः एक स्कोरिंग विषय असाच दृष्टीकोन होता. 
 
     तसं इतिहास म्हंटल कि मराठी माणसाला पहिली आठवण होते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज . हिंदुस्तानच्या इतिहासातील एक सुवर्ण पानच आहे ते. मला पण इतिहास बदल ची आवड ऐतिहासिक कादंबरी वाचनानेच झाली. बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपति मनात कोरून बसलं. श्रीमंत माधवराव पेशव्यांवरील "स्वामी", शिवाजी सावंत लिखित "छावा", "पानिपत" वाचताना मराठ्यांचा पराभव मनाला चटका लावून जातो. अश्या अनेक ऐतिहासिक कादंबरी वाचताना एके दिवशी सरदेसाई लिखित "मराठी रियासत" हाती आलं आणि मराठेशाहीच्या इतिहासाचा खजिना हाती लागला आणि मग इतिहासाकडे निव्वळ गोष्टी म्हणुन न पाहता त्यातील अंतरंग पाहण्याची आवड निर्माण झाली त्याच वाचनाचा सारांश लिहिण्याचा हा प्रयत्न. 
 
    इतिहास वयाक्तिक किंवा सामाजिक घडामोडींकडे macro नजरेने बघायला शिकवतो . अशा वर्तमानातील दैनदिन घडामोडींचे किंवा समाजाच्या / देशाच्या strategy चे भविष्यात काय परिणाम होतील ते इतिहासतील आरश्य कडे पहिले तर समजू शकेल. current strategy चे अवगुण वर्तमानात दिसत नाही पण भविष्यात त्याचे दुष्परिणाम भयंकर असतात हे मराठ्यांचा इतिहास वाचताना जाणवत. छत्रपती शिवाजी  महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोविली, त्या छोट्याश्या स्वराज्याला पेशव्यांनी अखंड हिंदुस्तानात पसरवलं पण शिवशाही म्हटलं कि रामराज्य  आठवत पण पेशवाईला तो आदर, मानसन्मान का मिळत नाही हा प्रश्न मनाला पडायचं आणि त्याचा उत्तर महाराजांच्या आणि पेशव्यांच्या motive मध्ये मिळालं.  महाराजांनी जीवावर उदार होऊन युद्ध्ये खेळली ते हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी, पेशव्यांनी सुद्धा असंख्य युद्ध्ये जिंकत हिंदुस्तान पादाक्रांत केला पण त्यांचा युद्ध्ये जिंकण्यामागचा  उद्देश मुख्यत्वे स्वतः वरील कर्जे फेडणे हा असायचा, ह्याचा परिणाम देशाभिमान हळू हळू कमी होत गेला परिणामतः बलाढ्य मराठी साम्राज्य मुठभर इंग्रजांच्या हाती गेलं . 
          प्राचीन इतिहास वाचताना पण असं काही लक्षात येतं . सम्राट अशोक बद्दल नक्कीच आदर आहे आणि त्यांचा कार्य पण महान आहे. पण एक गोष्ट जाणवते सम्राट अशोकाने बोद्ध धर्म आणि बोद्ध धर्माची शिकवण अहिंसा ह्याचा अंगीकार आणि प्रचार करताना सैन्यबळ वाढवण्याकडे दुर्लक्ष केलं आणि राष्ट्राच्या सीमांचं शत्रूपासून रक्षण सशस्त्र सैन्यच करु शकत हि चाणक्य नीती विसरला पुढे अशोकाच्या उत्तराधीकार्यांनी सुद्धा तीच परंपरा कायम ठेवली आणि अंत्यथा मौर्य साम्राज्य समाप्त झालं 
 
        त्याचप्रमाणे हल्ली जे वोट बँक आणि भ्रष्टाचारच गलिछ राजकारण सुरु आहे त्याचे भविष्यात देशाला काय परिणाम भोगावे लागणार आहेत देव जाणो. वर्तमानात नकळत झालेल्या चुका जेंव्हा इतिहास बनतात तेंव्हा त्यांना माफी नसते आणि त्या पेक्षा वाईट म्हणजे त्या पुन्हा सुधारता येत नहित. इतिहासाकडे डोळस नजरेने पाहिलं  तर वयक्तिक अथवा सामाजिक वर्तमान सुदृड  राहील आणि पर्यवसन उज्ज्वल  भविष्यात होइल. 
 
    प्रस्तावना  लांबत  चालली आहे. शिवाजी महाराजांबद्दल वाचू आणि लिहू तेवढं  कमीच आहे. थोडा फार जे काही वाचन झाला आहे त्याचा सारांश लिहायचाच आहे  त्याच बरोबर आपल्या देशाला हजारो वर्षाची ऐतिहासिक परंपरा आहे. रामायण महाभारत हे पौराणिक आद्यकाव्य समजलं तरी ख्रिस्तपूर्व हजार वर्षापूर्वीचा मगध आणि ताक्षशिलेतला प्राचीन लिखित इतिहास आहे. त्याच् पण वाचन करायच आहे. पण ब्लोग ची सुरुवात मात्र श्री छत्रपति शिवाजी महाराजंच्या थोडक्यात माहितीने करावी.

प्रस्तावनेच्या शेवटी इतकंच सांगायचं आहे "जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो …"
 
 
___________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे 

इतिहासातून दोन शब्द - २. मराठेशाही वंशावळ

             शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दि. ६ जून १६७४  रोजी रायगडावर झाला आणि महाराज छत्रपति झाले, मराठी साम्राज्याची स्थापना झाली आणि सन १८१८ मध्ये इंग्रजांनी दुसर्या बाजीराव पेशव्यांचा पराभव केला आणि मराठेशाहीचा अंत झाला. असं जवळपास दीड शतक (१५० वर्षे) मराठ्यांनी तीन चतुर्थांश हिंदुस्थानावर राज्य केल. 
 
 
          ह्या दीड शतकातील मराठेशाही दोन खंडात बघता येइल. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य पुढे संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि ताराराणी ने संभाळल आणि दुसरा खंड ह्या स्वराज्याच्या पेशव्यांनी साम्राज्यात केलेला विस्तार 
 
     बऱ्याच जणांना शिवाजी महाराजांच्या मुलांची नावं विचारली तर संभाजी महाराजांचं नाव पटकन सांगता येतं पण राजाराम महाराज माहित नसतात तसच पेशव्यांच्या  बाबतीत घडतं. शिवाजी महाराज आणि पेशव्यांची वंशावळ थोडक्यात बघु. तत्पूर्वी शिवाजी महाराज्यांच्या कुळाविषयी 
 
    भोसले घराणे मूळचे राजस्थानातील मेवाड मधले मुळ नाव सिसोद्याचे राणा . सन  १३०३ मध्ये दिल्ली चा सुलतान अलाउद्दीन खिलजी याने मेवाड वर स्वारी केली आणि चितोडच्या किल्यास वेढा घालून ते राज्य काबीज केलं 
 ह्या संग्रामात सिसोद्याचा राणा लक्ष्मणसिंह धारातीर्थी पतन पावले लक्ष्मणसिंह चे सात मुलगेही त्याज  बरोबर मारले गेले . एक मुलगा अजयसिंह जिवंत राहिला तो पुढे सिसोद्याचा राणा  झाला अजयसिंहास  दोन मुले सजनसिंह व दुसरा क्षेमसिंह. अजयसिंह ने आपल्या पाश्च्यात पुतण्या हमीर यास गादीवर  बसविले. त्यामुळे नाराज होऊन हे दोन बंधू राजपुतान्यातून   दक्षिणेकडे आले . त्यांच्या पासून पुढे भोसले आणि घोरपडे ह्या घराण्याची उत्पत्ती झाली 
 
सजनसिंह १३५२ मध्य मरण पावला . त्याचा पाचवा वंशज उग्रसेन, त्यास दोन पुत्र मोठा कर्णसिंह व धाकटा शुभकृष्ण. कर्णसिंह  व त्याचा पुत्र भीमसिंह खेळणा  किल्ला घेण्यास गेले असता त्यांनी घोरपड लावून किल्ला हस्तगत केला, कर्णसिंह  संग्रामात मृत्यू पावल्या मुळे  त्याचा पुत्र भीमसिंह ह्यास "राजा घोरपडे बहाद्दूर" हा किताब व मुधोळ जवळ जागीर दिली  तेंव्हा पासून  भीमसिंहाचे  वंशज घोरपडे आडनाव प्राप्त होऊन मुधोळास  रहिले. 
 
कर्णसिंहाचा भाऊ शुभकृष्ण हा दौलताबाद जवळील वेरूळ वतनाचा मालक होऊन त्याचे वंशास भोसले हे नाव प्राप्त झाले. शुभकृष्णाचा तिसरा वंशज बंबाजी भोसले. या वरून लक्षात येईल मुधोळकर घोरपडे आणि भोसले हे सिसोदे येथील राणा वंशाच्या दोन शाखा आहेत. घोरपड्यानी मुसलमानाच्या ताबेदारीत धन्यता मानली आणि भोसल्यांनी मुसलमानाचा पाडाव करून स्वतंत्र राज्य स्थापले ह्या वरूनच भाऊबंदकीचे कलह कायमचे रहिले. 
 
बंबाजी ला दोन मुले मालोजी व विठोजी, दोघेही पराक्रमी निपजले. मालोजी ची बायको उमाव्वा हि फलटण च्या जगपाळ निंबळकराची बहीण. मालोजी व उमाव्वा ला दोन मुले शहाजी व शरीफजी 
 
शहजीचे लग्न सिंदखेड च्या जाधवरावांच्या जिजाबाईशी झाले. रामाच्या सुर्यवंशातील शहाजी व कृष्णाच्या यादव कुलीन जिजाबाई ला दोन मुले झाली मोठा संभाजी आणि धाकटा शिवाजी. 
 
३ ० ० वर्षाच्या अंधाऱ्या पारतंत्र्यातून स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन कृष्ण तृतीय शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३०  साली झाला 
 
                                                                   

    
 
 पेशवाई : बहुतांश लोकांना वाटतं पहिला पेशवा बाळाजी  विश्वनाथ किंवा बाजीराव पेशवे. खरतर पेशवे हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे पद - पंतप्रधान . महाराजांचा राज्याभिषेक झाला तेंव्हा पंप्रधान होते मोरोपंत पिंगळे पुढे संभाजी पुत्र शाहू महाराज छत्रपतींच्या गाडीवर बसले तेंव्हा श्रीवर्धन चे बाळाजी विश्वनाथ भट स्व:कर्तुत्वावर पेशवा बनले. तो पर्यंत पेशवे किंवा पंतप्रधान पद हे वारसा हक्काने मिळणारे नव्हत. मराठेशाही चा मुख्य कारभार साताऱ्या च्या छत्रपतींच्या गादी  कडून पेशव्यांच्या पुण्यात ह्याच दरम्यान आला . त्याला एक मुख्य कारण म्हणजे शाहू महाराज लहानपणापासून औरंगझेबाच्या कैदेत होते त्यांचे शिक्षण पण मुघल दरबारीच झाला त्या मुळे त्यांच्या आधीच्या महाराजां प्रमाणे तितकंसं युद्ध कौशल्य नव्हत. आणि पेशवेपद बाजीराव सारख्या पराक्रमी व्यक्ती कडे आलं  आणि हिंदुस्तानचे सत्ता केंद्र पुण्यातील शनिवार वाडा बनलं 
 
पेशव्यांची वंशावळ (पेशवाई पद कालावधी )
 
 

  
विश्वासराव आणि सदाशिवभाऊ हे पानिपतच्या लढाई मध्ये धरतार्थी पडले 
रघुनाथराव उर्फ राघोबादादांनी इंग्रजांच्या मदतीने काही काळ पेशवेपद मिळवलं होतं. 
 
साताऱ्यातील छत्रपतींच्या वतीने पेशवे मराठेशाहीचा राज्यकारभार बघायचे .  
 
 
 
___________________________________________________________________________
 
किशोर केशव झेमसे